श्रेया पंक्चर काढायला निघाली आणि मृत्यूने वाटतेच गाठले, होळीच्या आधी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 15:37 IST2026-03-03T15:36:27+5:302026-03-03T15:37:52+5:30

होळी सणाच्या पूर्वसंध्येलाच गाडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. अवघ्या २० वर्षांची लेक एका अपघाताने हिरावून नेली. 

Solapur accident: Shreya went to get a puncture and death almost overtook her, a mountain of grief for the family before Holi | श्रेया पंक्चर काढायला निघाली आणि मृत्यूने वाटतेच गाठले, होळीच्या आधी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

श्रेया पंक्चर काढायला निघाली आणि मृत्यूने वाटतेच गाठले, होळीच्या आधी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

पंढरपूर शहरात नवीन कराड नाका परिसरात पंढरपूर-कराड रस्त्यावर पंक्चर काढण्यासाठी सायकल घेऊन निघालेल्या दोन विद्यार्थिनीला टिपरने धडक दिली. या अपघातात एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला, तर तिच्या मैत्रिणीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

श्रेया कांतीलाल गाडे (वय २०, रा. आव्हे, ता. पंढरपूर) असे अपघातात मरण पावलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास झाला.

पाटील कर्मवीर भाऊराव महाविद्यालयात श्रेया गाडे ही बीसीएच्या दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेत होती. ती नवीन कराड नाका परिसरातील समाज कल्याण वसतिगृहात राहत होती. 

श्रेया व तिची मैत्रीण स्नेहा विठ्ठल सवयीसर्जे (वय १८, रा. सलगर, ता. मंगळवेढा) या दोघी रविवारी सायंकाळी ४ च्या सुमारास सायकल पंक्चर काढण्यासाठी सायकल घेऊन निघालेल्या होत्या.

दरम्यान नवीन कराडनाकाहून पंत चौकाकडे जाणाऱ्या (एम.एच. १३ ई.डब्ल्यू, ७६७७) टिप्परने त्यांना धडक दिली. या अपघातात श्रेया हिचा जागीच मृत्यू झाला, तर स्नेहा गंभीर जखमी झाली आहे. 

तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर वाहन चालक जखमींना उपचारासाठी दवाखान्यात घेऊन न जाता घटनास्थळावरून पळ काढला.

Web Title : पंक्चर ठीक कराने जा रही छात्रा की सड़क दुर्घटना में मौत

Web Summary : पंढरपुर में पंक्चर ठीक कराने के लिए साइकिल से जा रही एक छात्रा की टिप्पर ट्रक से टक्कर में मौत हो गई और उसकी दोस्त घायल हो गई। चालक मौके से फरार हो गया। मृतका की पहचान श्रेया गाडे के रूप में हुई, जो बीसीए की छात्रा थी।

Web Title : Student Dies in Road Accident While Going to Fix Puncture

Web Summary : A student died and her friend was injured in Pandharpur after being hit by a tipper truck while cycling to fix a puncture. The driver fled the scene. The deceased was identified as Shreya Gade, a BCA student.