वीज पडून चिमुकलीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 20:48 IST2019-10-29T20:47:40+5:302019-10-29T20:48:16+5:30
बीबीदारफळ येथील समृद्धी संतोष साठे ही मुलगी वीज अंगावर पडल्याने मृत्युमुखी पडली.

वीज पडून चिमुकलीचा मृत्यू
सोलापूर - बीबीदारफळ येथील समृद्धी संतोष साठे (वय-9) ही मुलगी वीज अंगावर पडल्याने मृत्युमुखी पडली. ऐन भाऊबिजेदिवशी समृद्धीचा मृत्यू झाला.
इयत्ता चौथीत जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेली समृद्धी सुट्टी असल्याने आईसोबत शेतात गेली होती. दुपारी साडेतीन वाजता वीजेचा कडकडाट व पाऊस सुरू झाला. समृद्धी पाऊस सुरू झाडाखाली थांबली होती. वीजेचा कडकडाट झाल्यानंतर झाडावर वीज पडली. समृद्धी खाली कोसळली. उपचारासाठी समृद्धीला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी मयत झाल्याचे जाहीर केले. ऐन भाऊबिजेदिवशी ही घटना घडल्याने साठे कुटुंबियांवर संकट कोसळले आहे.