शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

युन्नूसच्या अवयवदानाने वाचवले सहा जणांचे प्राण, सोलापुरात ११ वा ग्रीन कॅरीडॉर यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 2:22 PM

चोख पोलीस बंदोबस्त : सोलापुरात ११ वा ग्रीन कॅरीडॉर, अश्विनी रुग्णालयात पार पडली मोहीम

ठळक मुद्देमुस्लीम समाजातील  तरुणाचे अवयदानअवयदानाने सामाजिक सलोख्याचा फार मोठा संदेश सोलापुरात ही ११ वी ग्रीन कॅरीडॉर मोहीम ठरली

सोलापूर : रक्ताला अन् अवयवाला जात धर्म व पंथ नसतो असे म्हणतात ते काही खोेटे नाही. मुस्लीम समजाचा बकरीद सण सुरू असताना त्याच दिवशी  मुस्लीम समाजातील  तरुणाचे अवयदान केल्याने सहाजणांचे प्राण वाचले असून त्यात एका हिंदू महिलेचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. ज्याला अवयदान केले त्याचे नाव गुप्त ठेवले जाते.  या अवयदानाने सामाजिक सलोख्याचा फार मोठा संदेश आज जगाला दिला आहे. 

सोलापुरातील अश्विनी सहकारी रुग्णालयातून पोलीस बंदोबस्तात ग्रीन कॅरीडॉर मोहीम पार पडली. यामध्ये ब्रेनडेड रुग्ण युन्नूस सत्तार शेख (वय ३७, रा. नळदुर्ग, जि. उस्मानाबाद) या रुग्णाचे यकृत (लिव्हर), स्वादूपिंड (पॅनक्रियास), २ मूत्रपिंड आणि दोन डोळे अशा सहा अवयवांचे दान करण्यात आले. सोलापुरात ही ११ वी ग्रीन कॅरीडॉर मोहीम ठरली. 

ब्रेनडेड रुग्ण युन्नूस शेख रविवारी १९ आॅगस्ट रोजी तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथे अपघातात गंभीर जखमी झाला होता. युनुस हे उस्मानाबाद जि. प. मध्ये लिपिक होते.  त्यांच्यावर उपचार करण्यासाठी प्रसन्न कासेगावकर यांच्या रुग्णालयात दाखल केले होते. तेथून मंगळवारी अश्विनी रुग्णालयात दाखल केले.  तपासाअंती युन्नूसच्या डोक्यास गंभीर इजा झाल्याने डॉ. सिद्धेश्वर रुद्राक्षी, डॉ. प्रीतेश अग्रवाल, डॉ. शंतनू गुंजोटीकर यांनी त्याच्या विविध तपासण्या केल्या. अनेक चाचण्यानंतर २१ आॅगस्ट रोजी रात्री त्याला ब्रेनडेड घोषित करण्यात आले. 

त्यानंतर रुग्णाची पत्नी, मुले आणि नातलगांशी समुपदेशक स्वरुपा कवलगी यांनी चर्चा करुन अवयवदानासाठी प्रवृत्त केले. मेंदूमृत असला तरी त्यांच्या इतर अवयवांमुळे गरजू रुग्णास जीवदान मिळेल, असे समजावून सांगितले. नातलगांनी दु:खावेग बाजूला ठेवून अवयवदानास तयारी दर्शविली. संबंधित समितीच्या निर्णयानंतर अवयवदान मोहीम पार पडली. यातील लिव्हर पुण्याच्या ससून हॉस्पिटल तर १ किडनी व स्वादूपिंड पुण्याच्याच सह्याद्री हॉस्पिटलमधील गरजू रुग्णास ग्रीन कॅरीडॉर निर्माण करुन प्रत्यारोपणासाठी पाठवण्यात आले.

दुसरी किडनी अश्विनी रुग्णालयातील गरजू रुग्णास देण्यात आली. सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातील रुग्णासाठी दोन  डोळे दान करण्यात आले.  पैगंबरवासी युन्नूस शेख यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुले, चुलत भाऊ असा परिवार आहे. या अवयवदान प्रक्रियेत अश्विनी रुग्णालयाचे प्रेसिडेंट बिपीनभाई पटेल, चेअरमन चंद्रशेखर स्वामी, व्हाईस चेअरमन विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रसन्न कासेगावकर, डॉ. संदीप पाटील, डॉ. पल्लवी मेहता, डॉ. प्रियंका करडे यांनी यशस्वी प्रयत्न केले. अवयव काढण्याच्या मोहिमेत डॉ. विठ्ठल कृष्णा, डॉ. हेमंत देशपांडे, डॉ. किरण जोशी, डॉ. संदीप होळकर, डॉ. संजय गायकवाड, डॉ. विद्यानंद चव्हाण, डॉ. वैशाली दबडे, डॉ. अनुराधा कारंडे, डॉ. संतोष कलशेट्टी, डॉ. अरुणकुमार यांचा सक्रिय सहभाग होता. पुण्याच्या ससून व सह्याद्री हॉस्पिटल येथून डॉ.कमलेश बोकील, डॉ. संतोष थोरात, डॉ. अभिजित माने, डॉ. सेनथिल यांच्यासह सहकारी डॉक्टरांच्या वैद्यकीय पथकांचा ग्रीन कॅरीडॉर मोहिमेत सहभाग होता. प्रशासनातील डॉ. राजेंद्र घुली, डॉ. सत्येश्वर पाटील, म. सलीम सय्यद, दत्ता शिगेद, स्वप्निल लांबतुरे, अवधूत कुलकर्णी, सूर्यकांत कवलगी, शिवराम सरवदे, स्वप्निल घोडके, उमेश शिवशरण यांनी परिश्रम घेतले.

अवयवदानात सोलापूर अग्रेसर- सोलापुरात यापूर्वी अश्विनी सहकारी रुग्णालय, अश्विनी ग्रामीण रुग्णालय, कुंभारी येथून उस्मानाबादच्या पार्थ कोळी यांच्यासह अन्य दोघे, शासकीय रुग्णालयात बसवकल्याण येथील ओंकार अशोक महिंद्रकर, यशोधरा हॉस्पिटलमध्ये सविता डिकरे, कालिका महामुनी, चंद्रकांत घोळसगावकर, प्रकाश भागवत, सतीश पलगंटी, कृष्णाहरी बोम्मा आणि आता रवींद्र शिंगाडे, अश्विनी रुग्णालयात सुनील क्षीरसागर यांना आज (बुधवारी) युन्नूस शेख अशी अवयवदान केलेल्यांची नावे आहेत. सोलापुरात ही ११ वी ग्रीन कॅरीडॉर मोहीम राबवून सोलापूर अवयवदान मोहिमेत आघाडीवर राहिला आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरGreen Planetग्रीन प्लॅनेटhospitalहॉस्पिटलOrgan donationअवयव दान