धक्कादायक! लॉजवर पोलिसांचा छापा, सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत दोघांना अटक, ६ महिलाही ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 11:12 IST2025-04-03T11:11:44+5:302025-04-03T11:12:07+5:30

लॉजचा वापर करत सहा महिलांना पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करायला लावला जात होता.

Shocking Police raid lodge two arrested sex racket busted 6 women also detained | धक्कादायक! लॉजवर पोलिसांचा छापा, सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत दोघांना अटक, ६ महिलाही ताब्यात

धक्कादायक! लॉजवर पोलिसांचा छापा, सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत दोघांना अटक, ६ महिलाही ताब्यात

 Solapur Crime: बार्शी शहरातील लॉजच्या मालकांनी आणि व्यवस्थापकांनी संगनमताने लॉजचा कुंटणखान्याप्रमाणे वापर केल्याचं उघड झालं आहे. या लॉजमध्ये महिलांना बोलावून पैशाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास लावल्याप्रकरणी याबाबत शहर पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना १ एप्रिल रोजी बार्शीतील एका लॉजवर घडली.

याबाबत सहाय्यक पोलीस फौजदार सविता कोकणे यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी मालक आनंद रमेश माने आणि व्यवस्थापक सुनील काशीनाथ माने यांच्याविरुद्ध शहर पोलिसात बीएनएस कलम १४३:२. व्यापार प्रतिबंधक कायदा ३,४,५ व ६ नुसार गुन्हा दाखल केला असून, त्यांना अटक केली आहे. यातील सहा महिलांनाही ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रमेश माने आणि सुनील माने या आरोपींनी संगनमत करून या लॉजचा वापर करत पीडित सहा महिलांना बोलावून घेऊन पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यास लावत होता. यातून येणाऱ्या कमाईवर स्वतःची उपजीविका करत असल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे. पुढील तपास पो.निरीक्षक रणजीत माने करत आहेत. 

दरम्यान, आरोपींना बार्शी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलिस कोठडी दिली आहे.

Web Title: Shocking Police raid lodge two arrested sex racket busted 6 women also detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.