शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचीही होणार ऊस परिषद ?

By admin | Updated: October 27, 2014 23:44 IST

शेतकऱ्यांशी नाळ टिकविण्यासाठी तसेच आपले कर्तृत्व व नेतृत्व सिद्ध करून दाखविण्यासाठी

गणपती कोळी - कुरुंदवाड -विधानसभा निवडणूक तिकीट वाटपावरून ‘स्वाभिमानी’त फूट पडून खंदे फलंदाज उल्हास पाटील यांनी धनुष्यबाण हाती घेतले व त्यामध्ये यशस्वीही झाले. ऊस आंदोलन चळवळीतील भक्कम व अनुभवी नेतृत्व शिवसेनेला मिळाल्याने शिवसेनेमध्ये उल्हासमय वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांशी नाळ टिकविण्यासाठी तसेच आपले कर्तृत्व व नेतृत्व सिद्ध करून दाखविण्यासाठी आम. पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचीही ऊस परिषद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदापासून तालुक्यात दोन ऊस परिषद होण्याची शक्यता आहे.पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी हा प्रामुख्याने ऊस उत्पादक शेतकरी म्हणून ओळखला जातो. ऊस उत्पादनाचा खर्च व साखर कारखान्याकडून मिळणारा दर यामध्ये तफावत राहत नसल्याने शेतकरी चळवळीतून खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटना उदयास आली. ऊस उत्पादनासाठी येणारा एकरी खर्च तसेच एका टनापासून साखर कारखान्यांना मिळणारे साखर व उपपदार्थ यांच्या हिशेबाचा ताळमेळ सांगून शेतकऱ्यांमध्ये चळवळीच्या माध्यमातून खा. शेट्टी यांनी जागृती केली अन् योग्यवेळी आंदोलन केले. बऱ्याचअंशी आंदोलनाला यश आल्याने शेतकऱ्यांचा स्वाभिमानीबरोबर विश्वास अधिक दृढ झाला. त्यातूनच खा. शेट्टी यांना शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून प्रत्येकवेळी निवडणुकीतही यश येत गेले.ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर खा. शेट्टी यांचा आदरयुक्त दबाव असल्याने ऊस परिषद झाल्याशिवाय कोणताही शेतकरी उसाला तोड घेत नाही. त्यामुळे या ऊस परिषदेकडे शेतकऱ्यांबरोबरच साखर कारखानदार, प्रशासनाचे लक्ष लागून राहत असे. यंदा ऊस हंगाम प्रारंभीच विधानसभेची निवडणूक झाली. मात्र, ‘स्वाभिमानी’च्या शिरोळ विधानसभेच्या तिकीट वाटपावरून खा. शेट्टी यांचे खंदे फलंदाज उल्हास पाटील यांनी स्वाभिमानीला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेची त्यांनी उमेदवारी घेऊन यशही प्राप्त केले. या निवडणुकीत स्वाभिमानीत फूट पडल्याने तसेच खा. शेट्टी यांच्यावर जातीयवादाचा आरोप केल्याने खा. शेट्टी नाराज होते. तसेच निवडणुकीत पाटील यशस्वी झाल्याने स्वाभिमानीवरच आत्मचिंतन करण्याची वेळ आली.शेतकऱ्यांवरील पे्रम दाखविण्यासाठी प्रत्येक वर्षी शिवसेना स्वतंत्ररीत्या ऊस आंदोलन करीत असे. मात्र, यंदा जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढल्याने तसेच आ. पाटील यांच्या रूपाने ऊस आंदोलन चळवळीतील भक्कम व अनुभवी नेतृत्व मिळाल्याने शिवसेनेचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे. शेतकऱ्यांशी नाळ टिकविण्यासाठी तसेच आपले कर्तृत्व व नेतृत्व सिद्ध करण्यासाठी आ. पाटील शिरोळ येथे शिवसेनेची ऊस परिषद घेण्याच्या तयारीत आहेत. असे झाले तर यंदापासून तालुक्यातून दोन ऊस परिषद गाजण्याची शक्यता आहे.