शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
3
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
4
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
6
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
7
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
8
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
9
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
10
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
11
"आमिर खानच्या प्रोडक्शनमधून ऑडिशनसाठी फोन आला आणि...", नम्रता संभेरावने सांगितला 'तो' किस्सा
12
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
13
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
14
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
15
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
16
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
17
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
18
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
19
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
20
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर

भाजपाला 2016 मध्येच नीरव मोदीच्या घोटाळ्याची माहिती होती; शरद पवारांचा गौप्यस्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 6:29 PM

देशाला फसवून पळून गेलेली ही मंडळी भाजपला पाठिंबा देणारी

ठळक मुद्देआगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीसह समविचारी पक्षांची आघाडी होणार : शरद पवार देशाला फसवून पळालेले सर्वजण भाजपा समर्थक : शरद पवारदेशाचे आर्थिक लुट करणारे सत्ताधारी भाजपाचे समर्थक : शरद पवार

सोलापूर : देशात सर्वात मोठी लूट करणाऱ्या नीरव मोदीच्या घोटाळ्याची लेखी तक्रार देशातील एका प्रतिष्ठित व्यक्तीने प्रधानमंत्री कार्यालयात केली होती. मात्र, जाणूनबुजून या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यावेळी योग्य ती खबरदारी घेण्यात आली नाही. एकप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच नीरव मोदीला वाचवले, असा आरोप माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.नीरव मोदी प्रकरणी मनमोहन सरकारवर आरोप केले जात असले तरी नीरव याने २०११ मध्ये फक्त बँक खाते उघडले होते आणि बाकीची फसवणूक मोदी सरकारच्या काळातीलच असल्याचा आरोप पवार यांनी केला. पंतप्रधान कार्यालयाला याबाबत २०१६ मध्ये कळवूनही त्याची दखल घेतली गेली नसल्याने नीरव मोदी देशाला फसवून पळून जाण्यात यशस्वी ठरला, असेही पवार म्हणाले. देशाला फसवून पळून गेलेली ही मंडळी भाजपला पाठिंबा देणारी आहे, असा टोलाही पवार यांनी लगावला. पंढरपूर तालुक्यातील वाडीकुरोली येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे होते. तसेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खा. विजयसिंह मोहिते-पाटील, खा. धनंजय महाडिक, आ. गणपतराव देशमुख, आ. बबनराव शिंदे, आ. भारत भालके, आ. हणमंतराव डोळस, आ. सिद्धाराम म्हेत्रे, आ. दत्तात्रय सावंत, माजी खा. रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आ़ दीपक साळुंखे, विनायकराव पाटील, दिलीप माने, जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजन पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष बळीराम साठे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश शामराव पाटील, तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, प्रांतिक सदस्य राजूबापू पाटील, बाळासाहेब शेळके, युवराज पाटील, मनपा विरोधी पक्षनेता चेतन नरोटे आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, पंजाब नॅशनल बँकेतील गैरव्यवहाराचा मुख्य सूत्रधार नीरव मोदी हा ११ हजार कोटी घेऊन गेला. तो गेल्यानंतर आता सरकार म्हणते की, त्याचा पासपोर्ट रद्द करू. २०१६ साली पंतप्रधान कार्यालयाला पत्राद्वारे आम्ही कळविले होते. त्यावेळी चौकशी करून कारवाई करू, असे आम्हाला सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. जर शेतकऱ्यांची बँकेची ४-५ हजारांची थकबाकी राहिली तर भांडी बाहेर काढली जातात. त्याच्या अब्रुचा पंचनामा केला जातो. हे कसले राज्यकर्ते?, असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला.डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात तांदळाच्या निर्यातीत भारत जगात एक नंबर होता. तसेच गहू आणि कापसाच्या निर्यातीत भारताचे स्थान दुसरे होते. सध्या अर्थव्यवस्था ढासळण्यामागे शेतमालाला योग्य भाव न मिळणे, हे प्रमुख कारण आहे. शेतकरी आता मंत्रालयात जाऊन आत्महत्या करू लागला आहे. ही परिस्थिती चिंताजनक असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरSharad Pawarशरद पवारNirav Modiनीरव मोदीPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळा