उळे येथे एकाच रात्री फोडली सात घरे, लाखोंचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 15:17 IST2018-11-10T15:15:40+5:302018-11-10T15:17:42+5:30

या घटनेनंतर सोलापूर तालुका पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाºयांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.

Seven houses, which were looted at one night in Lule, and Lakhs of millions | उळे येथे एकाच रात्री फोडली सात घरे, लाखोंचा ऐवज लंपास

उळे येथे एकाच रात्री फोडली सात घरे, लाखोंचा ऐवज लंपास

ठळक मुद्दे- सोलापूर तालुका पोलीसांचे पथक घटनास्थळी दाखल- चोरीच्या घटनेने गावात भितीचे वातावरण- पोलीसांचा पंचनामा सुरू, चोरट्यांच्या तपासासाठी पथके रवाना

सोलापूर : सोलापूर - तुळजापूर रोडवर असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे या गावात शुक्रवारी रात्री व शनिवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री सात ते आठ घरे फोडली. या घरफोडीत चोरट्यांनी लाखो रूपयांचा ऐवज लंपास केला आहे.

उळे (ता. द. सोलापूर) येथील गावात राहणाºया सात ते आठ घरांचे कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. या घटनेनंतर सोलापूर तालुका पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाºयांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. चोरांच्या शोधासाठी पोलीसांची पथके तयार करण्यात आली असून सकाळी ११ वाजता पंचनामा करण्याचे काम सुरू होते.

या घटनेत १ तोळा सोने व अन्य साहित्य, रोख रक्कम ६२ हजार असा सव्वा लाखांपर्यंतचा मुद्देमाल चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती पोलीसांनी दिली आहे़ याचवेळी चोरट्यांनी चोरी करीत असताना महिला ग्रामस्थांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन मारहाण केल्याचे पोलीसांना दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आल्याचे प्राथमिक माहितीवरून सांगण्यात आले.


 

Web Title: Seven houses, which were looted at one night in Lule, and Lakhs of millions