चेन्नई, गदग, तिरूअनंपूरम अन् सोलापूर एक्सप्रेसचे वेळापत्रक बदलले; रेल्वेचा ट्रॉफिक ब्लॉक

By Appasaheb.patil | Published: November 11, 2022 11:38 AM2022-11-11T11:38:05+5:302022-11-11T11:38:13+5:30

हैदराबाद एक्सप्रेस १९,२० नोव्हेंबरला रद्द

Schedule of Chennai, Gadag, Thiruvananthapuram and Solapur Express changed; Railway trophic block | चेन्नई, गदग, तिरूअनंपूरम अन् सोलापूर एक्सप्रेसचे वेळापत्रक बदलले; रेल्वेचा ट्रॉफिक ब्लॉक

चेन्नई, गदग, तिरूअनंपूरम अन् सोलापूर एक्सप्रेसचे वेळापत्रक बदलले; रेल्वेचा ट्रॉफिक ब्लॉक

Next

सोलापूर : मध्य रेल्वेतील मुंबई विभागात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मस्जीद दरम्यान अप लाइन आणि डाऊन लाइन, अप आणि डाऊन थ्रू लाइन्स वरील पूल तोडण्याच्या कामाकरिता १९ व २० नोव्हेंबर २०२२ रोजी ट्रॉफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ट्रॉफिक आणि पॉवर ब्लॉकमुळे १९ व २० नोव्हेंबर रोजी सोलापूर विभागातून धावणा-या मेल एक्सप्रेस गाड्या रद्द/शार्ट टर्मिनेट करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

याशिवाय चेन्नई सेंट्रल - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस दादर स्थानकापर्यन्त, हैदराबाद- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस दादर स्थानकापर्यन्त, गदग- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस पुणे स्थानकापर्यन्त, सोलापूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस पुणे स्थानकापर्यन्त तर तिरुअनंतपुरम - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस पुणे स्थानकापर्यन्त धावणार आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- चेन्नई एगमोर एक्सप्रेस दादर स्थानकाहून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चेन्नई सेंट्रल एक्सप्रेस दादर स्थानकाहून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हैदराबाद एक्सप्रेस दादर स्थानकाहून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - लातूर एक्सप्रेस दादर स्थानकाहून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - तिरुअनंतपुरम एक्सप्रेस दादर स्थानकाहून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - गदग एक्सप्रेस पुणे स्थानकाहून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सोलापूर एक्सप्रेस पुणे स्थानकाहून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चेन्नई एगमोर एक्सप्रेस दादर स्थानकाहून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चेन्नई सेंट्रल एक्सप्रेस दादर स्थानकाहून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - हैदराबाद एक्सप्रेस दादर स्थानकाहून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - लातूर एक्सप्रेस दादर स्थानकाहून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - तिरुअनंतपुरम एक्सप्रेस दादर स्थानकाहून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - गदग एक्सप्रेस पुणे स्थानकाहून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सोलापूर एक्सप्रेस पुणे स्थानकाहून आपल्या निर्धारित वेळेवर सुटणार आहेत.

रदद् करण्यात आलेल्या गाड्या...

- हैदराबाद - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस रद्द.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- हैदराबाद एक्सप्रेस रद्द.

Web Title: Schedule of Chennai, Gadag, Thiruvananthapuram and Solapur Express changed; Railway trophic block

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.