शेतकऱ्यांसाठी खास मोहीम, मोदी सरकार २० जूनपर्यंत देतंय 'ही' संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 02:35 PM2024-06-11T14:35:55+5:302024-06-11T14:43:03+5:30

PM Kisan Saturation Campaign : सॅचुरेशन मोहिमेद्वारे शेतकरी स्वतःला योजनेत समाविष्ट करू शकतात.

सरकारकडून शेतकऱ्यांसाठी सॅचुरेशन मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शेतकरी CSC केंद्रावर जाऊन शेतकरी सन्मान निधी योजनेत सामील होऊ शकतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ९ जून रोजी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. यानंतर १० जूनला पदभार स्वीकारला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पदभार स्वीकारताच, शेतकऱ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याच्या फाइलवर सर्वप्रथम स्वाक्षरी केली.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत देशातील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या सॅचुरेशन मोहिमेद्वारे शेतकरी स्वतःला योजनेत समाविष्ट करू शकतात.

शेतकरी सॅचुरेशन मोहिमेदरम्यान योजनेसाठी अर्ज करू शकतात. तसेच, शेतकरी ई-केवायसी करून घेऊ शकता. पोर्टलवर जमिनीचा तपशील अपलोड केला जाऊ शकतो. यासोबतच शेतकरी आपले बँक खाते आधारशी लिंक करू शकतात.

या मोहिमेबाबत कोणत्याही शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारची माहिती हवी असल्यास. ते आपल्या जवळच्या CSC केंद्रावर जाऊन माहिती घेऊ शकतात. ही सॅच्युरेशन मोहीम २० जूनपर्यंतच चालवली जाईल.

दरम्यान, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत देते. आतापर्यंत या योजनेचे १६ हप्ते जाहीर झाले आहेत.

१७ व्या हप्त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पदभार स्वीकारताच, शेतकऱ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या या किसान सन्मान निधी योजनेच्या फाइलवर सर्वप्रथम स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे हा हप्ता जूनच्या शेवटी किंवा जुलैच्या सुरुवातीला येऊ शकते.