मंगळवेढ्यात वाळू माफियांनी पोलीस कर्मचाऱ्याला चिरडलं; पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:14 PM2021-09-25T16:14:21+5:302021-09-25T16:17:01+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकींग

The sand mafia crushed a police officer on Tuesday; Police officer dies on the spot | मंगळवेढ्यात वाळू माफियांनी पोलीस कर्मचाऱ्याला चिरडलं; पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

मंगळवेढ्यात वाळू माफियांनी पोलीस कर्मचाऱ्याला चिरडलं; पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

Next

मंगळवेढा : वाळूची गाडी थांबवताना भरधाव वेगाने येणाऱ्या वाळू टेम्पोने चिरडल्याने पोलीस कॉन्स्टेबलचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवेढा तालुक्यात घडली आहे.  गणेश प्रभू सोनलकर ( 32) असे मृत्यू झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे.

दरम्यान, ही धक्कादायक घटना आज सकाळी दहाच्या सुमारास गोनेवाडी-शिरशी ता मंगळवेढा रोडवरील हॅट्सन डेयरी येथे घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, लोकअदालत असल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल गणेश सोनलकर हे समन्स बजावण्यासाठी गेले होते. गोनेवाडीचे पोलीस पाटील संजय मेटकरी यांना हॅट्सन डेयरी येथे या म्हणून गणेश सोनलकर हे वाट पाहत तिथे थांबले होते.  याचवेळी समोरून येणाऱ्या वाळूच्या टेम्पोला हात केला असता वाळू टेम्पो चालकाने गाडी त्यांच्या अंगावर घालून चिरडले असता त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. यातील आरोपींना लवकरच पकडण्यात येणार असल्याचे अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मत जाधव यांनी लोकमत शी बोलताना सांगितले.

Web Title: The sand mafia crushed a police officer on Tuesday; Police officer dies on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app