शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

सख्या भावाने बहिणीला ढकलून दिले विहिरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 6:12 PM

कुर्डूवाडी येथील घटना; दीड तासानंतर क्रेनद्वारे महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात आले यश

ठळक मुद्देया घटनेची माहिती मिळताच कुर्डूवाडी पोलिसांनी दिली घटनास्थळाला भेटतब्बल दीड तासाच्या प्रयत्नानंतर विहिरीत पडलेल्या महिलेचा सुखरूप बाहेर काढण्यात आले यश

कुर्डूवाडी : सख्या भावाने बहिणीला विहिरीत ढकलून दिल्याची घटना रविवारी  सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास कुर्डुवाडी बायपास रोड जवळील काळे यांच्या विहिरीत घडली. सदरची महिला विहिरीत पडल्यानंतर मोटारीच्या पाइपला धरून तब्बल दीड तास पाण्यात होती, त्यानंतर क्रेनच्या साह्याने तिला सुखरूप बाहेर काढण्यात आले.

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, सविता गोसावी (वय 30) ही महिला आपल्या माहेरी कुर्डुवाडी येथे आली होती. ती आपल्या मैत्रिणीला भेटायला गेल्यावर तिचा सख्खा भाऊ सचिन गोसावी यांनी तिला आणले व बायपास जवळील काळे यांच्या विहिरीत ढकलून दिले. तेथे शेतात काम करणाऱ्या  महिलांना वाटले की दगड विहिरीत पडला. नंतर महिलांनी विहिरीत पाहिले असता विहिरीततील महिला मोठ मोठ्याने ओरडत होती. यावेळी तेथूनच एक इसम पळताना दिसला. शेतमजूर महिलांनी ओरडतच बायपासवरून जात असलेले किनारा उद्योग समूहाचे मालक हरिभाऊ बागल यांना सांगितले. हरिभाऊ बागल यांनी त्याचा पाठलाग केला मात्र तू बायपासच्या दुसऱ्या बाजूने पळून गेला.

शेतमजूर महिलांनी बाई विहिरीत पडली असे ओरडतच बायपास येथे येऊन गोंधळ केला. यादरम्यान तिथून जाणारे अमर कुमार माने, मुन्ना माने, दीपक शिंदे, खंडू मदने यांनी महिला विहिरीत पडल्याचे पाहिले. तातडीने त्यांनी कुर्डूवाडी पोलीस, ॲम्बुलन्सला फोन केला व क्रेनवाल्याला फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले.  तोपर्यंत बघ्यांची गर्दी झाली होती. यातीलच फुलचिंचोली तालुका पंढरपूर येथून आंबेजोगाईला जाणारे दत्तात्रय कुंभार हे प्रवासी विहिरीत उतरले व क्रेनवाल्यांनी विहिरी सोडलेल्या दोराच्या सहाय्याने महिलेला वर उचलून काढली त्यानंतर अँब्युलन्समधून तिला ग्रामीण रुग्णालयात आणले प्रथम उपचार केल्यानंतर तिला सोलापूर येथे हलविण्यात आले.

टॅग्स :Solapurसोलापूरmadha-acमाढाAccidentअपघातwater shortageपाणीकपातSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस