आरटीओ कार्यालयातील कर्मचार्‍यास मारहाण

By Admin | Updated: June 1, 2014 00:47 IST2014-06-01T00:47:50+5:302014-06-01T00:47:50+5:30

सोलापूर: आरटीओ कार्यालयातील कर्मचार्‍यास एजंटाने मारहाण केल्याने कामकाजावर परिणाम झाला.

RTO employee assaulted employees | आरटीओ कार्यालयातील कर्मचार्‍यास मारहाण

आरटीओ कार्यालयातील कर्मचार्‍यास मारहाण

सोलापूर: आरटीओ कार्यालयातील कर्मचार्‍यास एजंटाने मारहाण केल्याने कामकाजावर परिणाम झाला. आरटीओ कार्यालयात सायंकाळी पाच वाजेच्या सुमाराला एका एजंटाने नोंदणी विभागात गोंधळ घातला. त्याला समजावण्यासाठी गेलेल्या कर्मचार्‍यास एजंटाने मारहाण केली. त्यामुळे संतापलेल्या कर्मचार्‍यांनी आयटीआय पोलीस चौकी गाठली. सपोनि सूर्यवंशी यांच्याकडे दोन्ही गटाने तक्रारी केल्या. सुमारे तीन तास ही वादावादी चालली. शेवटी सामोपचाराने प्रकरण मिटले; पण या भांडणामुळे पाच वाजता आरटीओ कार्यालयात सन्नाटा पसरला होता. वाहन निरीक्षकही निघून गेले होते.

Web Title: RTO employee assaulted employees