सोलापूरच्या निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांची पर्यटन विभागात बदली

By बाळकृष्ण दोड्डी | Published: September 14, 2023 12:47 PM2023-09-14T12:47:30+5:302023-09-14T12:47:44+5:30

मागील तीन वर्षाहून अधिक काळापासून शमा पवार या निवासी उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत होत्या.

Resident Deputy Collector of Solapur Shama Pawar has been transferred to Tourism Department | सोलापूरच्या निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांची पर्यटन विभागात बदली

सोलापूरच्या निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांची पर्यटन विभागात बदली

googlenewsNext

सोलापूर : निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांची पर्यटन संचालनालयात उपसंचालक पदावर त्यांची बदली झाली आहे. पुणे येथील कार्यालयात तत्काळ रुजू होण्याचे आदेश महसूल विभागाने काढले. 

मागील तीन वर्षाहून अधिक काळापासून शमा पवार या निवासी उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत होत्या. त्यापूर्वी त्या माळशिरसच्या प्रांताधिकारी पदावर कार्यरत होत्या. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी पदाची जबाबदारी स्वीकारली होती. मागील काही दिवसांपासून त्यांची बदली होणार, अशी चर्चा सुरू होती.

अखेर महसूल विभागाने गुरुवारी सकाळी बदलीचे आदेश काढले. त्यांची ही नियुक्ती पुढील तीन वर्षासाठी राहणार आहे. पवार यांच्या सेवा पर्यटन विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे सुपूर्द करण्यात येत आहे. तसेच त्यांनी प्रधान सचिव पर्यटन विभाग, मुंबई यांच्याकडे तात्काळ हजर व्हावे, असेही त्या आदेशात म्हटले आहे.

Web Title: Resident Deputy Collector of Solapur Shama Pawar has been transferred to Tourism Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.