बालमृत्यू कमी करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी काम करावे; सोलापूर झेडपीच्या सीईंओंचे सुचना

By Appasaheb.patil | Published: September 2, 2022 07:58 PM2022-09-02T19:58:15+5:302022-09-02T19:58:22+5:30

सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप  स्वामी यांचे आवाहन

Relevant mechanisms should work to reduce child mortality; Notice of CEs of Solapur ZP | बालमृत्यू कमी करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी काम करावे; सोलापूर झेडपीच्या सीईंओंचे सुचना

बालमृत्यू कमी करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी काम करावे; सोलापूर झेडपीच्या सीईंओंचे सुचना

Next

सोलापूर : आरोग्य विभागाने बऱ्याच निर्देशांकांमध्ये उल्लेखनीय काम केलेले आहे. असेच काम बालमृत्यूबाबत आरोग्य विभाग व महिला व बालविकास विभागाने समन्वयाने काम करावे. बालमृत्यू कमी करण्यासाठी कारणाचा शोध घेऊन जिल्ह्यामध्ये जनतेच्या सहकार्याने संबंधित यंत्रणांनी काम करावे, ते काम उल्लेखनीय काम होऊ शकते, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.

आरोग्य विभाग व महिला बालकल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण सभागृह येथे जीवनाची हमी - बाल मृत्यू कमी याअंतर्गत बालमृत्यू कमी करण्यासाठी विशेष कार्यशाळा आयोजित केली होती. कार्यशाळेस जिल्ह्यातील वैद्यकीय अधीक्षक, तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, जिल्हास्तरीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना स्वामी बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव, महिला व बालकल्याण अधिकारी जावेद शेख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदिप ढेले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बिरुदेव दुधभाते, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी आदी उपस्थित होते.

स्वामी यांनी सांगितले की, समाजामध्ये आरोग्य विषयक अनेक समस्या आहेत. त्यामध्ये प्राधान्याने बालमृत्यू व उपजत मृत्यू ही मोठी समस्या आहे. बालमृत्यूची कारणे शोधून संवेदनशील पद्धतीने आणि सर्वांच्या समन्वयाने त्यावर मात करता येईल. बालकांच्या जीविताची हमी देता येईल. जिल्ह्यात बालमृत्यू होणार नाहीत, याबाबत सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी. जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ.घोडके यांनी लसीकरणाबद्दल मार्गदर्शन केले.

 

Web Title: Relevant mechanisms should work to reduce child mortality; Notice of CEs of Solapur ZP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.