Solapur Politics; रणजितसिंहांना भाजपाची आॅफर नाही; विजयसिंह मोहिते-पाटील यांचा खुलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 16:02 IST2019-02-28T16:00:17+5:302019-02-28T16:02:48+5:30
माढा : भाजपाकडून माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना कोणत्याही प्रकारची आॅफर नसून, खासदार पवारांच्या उमेदवारीबाबत आपणच मागणी केल्याचा खासदार ...

Solapur Politics; रणजितसिंहांना भाजपाची आॅफर नाही; विजयसिंह मोहिते-पाटील यांचा खुलासा
माढा : भाजपाकडून माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना कोणत्याही प्रकारची आॅफर नसून, खासदार पवारांच्या उमेदवारीबाबत आपणच मागणी केल्याचा खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी खुलासा केला.
माढ्यात पासपोर्ट कार्यालय उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री असताना सर्वांना न्याय देण्याची भूमिका घेतली होती तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी चांगले संबंध असल्याने सातशे किलोमीटरपेक्षा जास्त रस्ते मतदारसंघात करण्यासाठी निधी मिळाला आहे.
बाराशे कोटी रुपये खर्च करून करमाळा- कुर्डूवाडी ग्रीन कॉरिडोर हा सहापदरी रस्तादेखील मंजूर करण्यात आला आहे. मोडनिंब रेल्वे पुलाची उंची वाढवणे, कुर्डूवाडी वर्कशॉपसाठी निधी, जेऊर, सांगोला, माढा तालुक्यातील महातपूर गेट यासारखी रेल्वे संबंधित कामे करता आली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार धनाजीराव साठे, नगराध्यक्षा मीनल साठे, माजी झेडपी सदस्य आनंदराव कानडे, माजी नगराध्यक्षा अनिता सातपुते, राहुल लंकेश्वर, गंगाराम पवार, नगरसेविका सुप्रिया बंडगर, शीला खरात, समीर सापटणेकर,नीलेश बंडगर आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादीत गटबाजी नाहीच...
- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उमेदवारीची मागणी कोणत्याही अपेक्षेशिवाय आपण केली असून, राष्ट्रवादी अंतर्गत गटबाजी नाही, असा खुलासाही खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी केला.