सोलापुरात रणजी सामना; पहिल्या डावात महाराष्ट्राच्या हितेश वाळुंजने घेतल्या ६ विकेट्स

By Appasaheb.patil | Published: February 2, 2024 04:55 PM2024-02-02T16:55:37+5:302024-02-02T16:57:04+5:30

सोलापुरात महाराष्ट्र विरूध्द सौराष्ट्र यांच्यात शुक्रवारी सकाळी रणजी सामना सुरू झाला.

Ranji match at solapur hitesh walunj of maharashtra took 6 wickets in the first innings | सोलापुरात रणजी सामना; पहिल्या डावात महाराष्ट्राच्या हितेश वाळुंजने घेतल्या ६ विकेट्स

सोलापुरात रणजी सामना; पहिल्या डावात महाराष्ट्राच्या हितेश वाळुंजने घेतल्या ६ विकेट्स

आप्पासाहेब पाटील, सोलापूर : सोलापुरात महाराष्ट्र विरूध्द सौराष्ट्र यांच्यात शुक्रवारी सकाळी रणजी सामना सुरू झाला. पहिल्या डावात महाराष्ट्र संघाकडून हितेश वाळुंजने ६ विकेट्स मिळवित सौराष्ट्र संघाला चांगलाच धक्का दिला. पहिल्या डावात महाराष्ट्र संघ मजबूत स्थितीत परतला आहे. 

दरम्यान, महाराष्ट्र विरूध्द सौराष्ट्र हा रणजी सामना शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता सुरू झाला. ब्रेकफास्ट वेळेपर्यंत सौराष्ट्र संघाची धावसंख्या ५ बाद १०२ एवढी झाली होती. पहिल्या डावात महाराष्ट्राच्या हितेश वाळुंज या फिरकीपटूने ६ विकेट्स मिळविल्या. त्याने केविन जीवराजनी, हरविक देसाई, विश्वराज जडेजा, चेतेश्वर पुजारा, डी. जडेजा, जयदेव उनकवाड या महत्वाच्या फलंदाजांना बाद करीत पहिला दिवस गाजविला. २९ वर्षानंतर सोलापुरात होत असलेला हा दुसरा रणजी सामना आहे. हा रणजी सामना पाहण्यासाठी शाळकरी मुलं,मुली यांच्यासाेबतच क्रिडाप्रेमींनी मोठी गर्दी केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त व खासगी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहे. सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनने पदाधिकारी विविध पातळीवर सामना यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

Web Title: Ranji match at solapur hitesh walunj of maharashtra took 6 wickets in the first innings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.