शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

प़महाराष्ट्रातील योजना प्रलंबित : ठाकरे

By admin | Updated: June 22, 2014 00:49 IST

योजना काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी सरकारने जाणूनबुजून प्रलंबित ठेवल्या आहेत़

सांगोला : पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागास वरदान ठरणाऱ्या शेतीच्या सिंचन योजना काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी सरकारने जाणूनबुजून प्रलंबित ठेवल्या आहेत़ या सर्व योजना पूर्ण करण्यासाठी आगामी निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या संख्येने निवडून देण्याचे आवाहन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.राज्यात भाजप-सेनेचे सरकार असताना अनेक लोकोपयोगी कामे केली आहेत़ पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यासाठी शेतीचे पाणी मिळावे यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळ स्थापन करून मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली़ प्रत्यक्ष कामालाही सुरुवात केली. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी सरकारने या सर्व सिंचन योजनाच सडवून टाकल्या आहेत. या योजना जाणीवपूर्वक अर्धवट ठेवल्या. सिंचन योजनेत सत्ताधाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. गेल्या १४ वर्षांत आघाडी सरकारने मोठ्या प्रमाणात निधी खर्च करूनही सिंचनाची कामे अपूर्ण ठेवली आहेत. लवकरच आपण सांगोला दौरा करणार असल्याचे ठाकरे म्हणाले.अ‍ॅड. शहाजीबापूंना शिवसेना बळ देईल, परंतु कसल्याही परिस्थितीत सांगोला विधानसभा मतदारसंघात भगवा फडकला पाहिजे, असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख विश्वनाथ नेरूरकर, सांगोला विधानसभा निरीक्षक निवांत घेरडे, जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, पुरुषोत्तम बरडे, शाहू शिंदे, माजी आमदार राजेंद्र राऊत, लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, नगरसेविका अस्मिता गायकवाड, संभाजी शिंदे, सूर्यकांत घाडगे, मधुकर बनसोडे, कमरुद्दीन खतीब, माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ, अ‍ॅड. उदयबापू घोंगडे, नगरसेवक अरुण बिले, आनंद घोंगडे, बाळासाहेब मस्के, बाबुराव खंदारे, सुनील भोरे, राजकुमार जाधव, संदीप केंदळे, सुभाष पाटील, सागर पाटील, नंदकुमार शिंदे, पांडुरंग मिसाळ, अजितकुमार ताटे, विजय शिंदे, रवींद्र पाटील, दिग्विजय पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.