शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
2
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
3
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
4
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
5
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
6
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
7
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
8
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
9
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
10
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
12
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
13
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
14
विरार-अलिबाग कॉरिडॉर सहा जोडण्यांद्वारे महानगरांना कनेक्ट करणार; ७५ हेक्टरवरील ५०४३ खारफुटी बाधित होणार
15
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
16
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
17
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
18
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
19
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
20
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाश आंबेडकर सोलापुरातून लढणार, मी आता तब्बल तीस दिवस मुक्कामी : सुजात आंबेडकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 12:52 IST

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर अकोल्यासह सोलापुरातूनही निवडणूक लढणार आहेत.

ठळक मुद्देवंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर अकोल्यासह सोलापुरातूनही निवडणूक लढणार आहेत.आंबेडकरांच्या प्रचारासाठी मी पुढील ३० दिवस सोलापूर मुक्कामी - सुजात आंबेडकरकेवळ निवडणुका आल्या की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते बहुजन समाजातील नेत्यांच्या घरी जातात - सुजात आंबेडकर

सोलापूर : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर अकोल्यासह सोलापुरातूनही निवडणूक लढणार आहेत. यासंदर्भात काँग्रेसने अपप्रचार करणे बंद करावा. आंबेडकरांच्या प्रचारासाठी मी पुढील ३० दिवस सोलापूर मुक्कामी आहे, अशी माहिती प्रकाश आंबेडकरांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

 सुजात आंबेडकर म्हणाले, सोलापुरातील कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांना विनंती केली होती. ही विनंती त्यांनी मान्य केली आहे. मागील खेपेला सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरातून निवडणूक लढविली होती. एवढं चांगलं नेटवर्क असूनही शिंदे यांचा पराभव झाला. त्यांच्याविरोधातील नाराजी अद्यापही कायम आहे.

सोलापूरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो येथील पाण्याचा. येथील उद्योग, शिक्षण, गायरान जमिनींचे प्रश्न कायम आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे वंचित बहुजन समाजाचे प्रतिनिधीत्व करतात ही सर्वात मोठी अफवा आहे. त्यांनी वंचित समाजाला केवळ लॉलीपॉप देण्याचे काम केले. बहुजन समाज आणि अल्पसंख्याक समाजाला एक हक्काचा मतदार बनवून ठेवले. केवळ निवडणुका आल्या की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते बहुजन समाजातील नेत्यांच्या घरी जातात. लोक आता त्यांच्यावर चिडलेले आहेत. म्हणून तर २०१४ साली लोकांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नाकारले.

भाजपाप्रमाणे काँग्रेसही फेक न्यूज पसरविते  - प्रकाश आंबेडकर सोलापुरातून लढणार नसल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी चर्चेत आले. याबद्दल विचारले असता सुजात आंबेडकर म्हणाले, काँग्रेसवाले या सर्व अफवा पसरवित आहेत. २०१९ च्या फेब्रुवारीपासून काँग्रेस एकाबाबतीत भाजपला फॉलो करीत आहेत ते म्हणजे फेक न्यूज. अबकी बार सोलापूर का खासदार, बाबासाहेब का वारसदार, हा नारा घेऊन आम्ही लोकांना भेटत आहोत. लक्ष्मण माने यांनी सातारा येथील सभेत जाहीर केले होते की प्रकाश आंबेडकर हे सोलापूर लोकसभा लढविणार आहेत. त्याला एक महिना झाला. पण अनेक लोकांचा त्यावर विश्वास बसला नाही. खरं तेव्हाच ही गोष्ट सर्वांनी गांभीर्याने घ्यायला हवी होती. अजून पुरावा आणि माहिती द्यायची गरज नाही.

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेSharad Bansodeशरद बनसोडेBJPभाजपाRamdas Athawaleरामदास आठवले