शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

सोलापूरात बनावट नोटा तयार करण्याचा कारखान्यांवर पोलीसांची धाड, आरोपी अटकेत, शहर गुन्हे शाखेची कारवाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:15 PM

गेल्या दहा वर्षांपासून लाखास तीन लाख याप्रमाणे तिप्पट नोटा देण्याचे आमिष दाखवून बनावट नोटा खºया म्हणून व्यवहारात आणून गंडवणाºया आरोपीच्या शुक्रवार पेठेतील घरावर छापा टाकून गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक केली.

ठळक मुद्देजियाउद्दीन अमीनसाब दुरुगकर (वय ६०) असे आरोपीचे नाव २७ जानेवारीपर्यंत पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश आजवर या आरोपीने अनेकांना गंडा घातला असून पोलीस तपासात आणखी माहिती पुढे येण्याची शक्यता

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २३ : गेल्या दहा वर्षांपासून लाखास तीन लाख याप्रमाणे तिप्पट नोटा देण्याचे आमिष दाखवून बनावट नोटा खºया म्हणून व्यवहारात आणून गंडवणाºया आरोपीच्या शुक्रवार पेठेतील घरावर छापा टाकून गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक केली. त्याच्याकडून बनावट नोटांसाठी वापरली जाणारी यंत्रसामग्री, बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. सोमवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. जियाउद्दीन अमीनसाब दुरुगकर (वय ६०) असे या आरोपीचे नाव आहे. आज न्यायालयाने त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, शुक्रवार पेठेत वास्तव्याला असणारा जियाउद्दीन दुरुगकर हा बनावट नोटा खºया म्हणून व्यवहारात आणण्यासाठी घरातच नोटांची छपाई करीत असल्याची गुप्त माहिती खबºयामार्फत फौजदार भीमसेन जाधव आणि त्यांच्या सहकाºयांना मिळाली होती. त्याची शहानिशा करण्यासाठी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील, सपोनि बाळासाहेब शिंदे, फौजदार जाधव यांच्यासह पथकाने सोमवारी रात्री ११.४० च्या सुमारास मिळालेल्या माहितीप्रमाणे शुक्रवार पेठेतील एक मजली इमारतीत सुमारास छापा टाकला. घराची झडती घेताना ईपसोन कंपनीचा कलर प्रिंटर, त्याच्या स्कॅनरमध्ये २ हजार रुपये दराच्या ओएलएम- ६६२९८१ व त्याखाली ७ एचजी ६२७२५० व त्याखाली ५०० रुपयांच्या ७ ईडब्ल्यू १५७२३८ व ७ ईडब्ल्यू १५७२३३ या क्रमांकाच्या नोटांची कलर झेरॉक्स प्रत मिळून आली.या खोलीची झाडाझडती घेताना ३६७ कोºया पानावर वर नमूद सिरीजच्या नोटांच्या दोन्ही बाजूंची झेरॉक्स प्रत अशा एकूण १८,४०,००० रुपये बनावट नोटांची प्रिंट, १०० रुपयांच्या एका बाजूने छपाई केलेल्या व त्याप्रमाणे कटिंग केलेले एकूण १८५ नोटांच्या आकाराचे कागद, १०० रु. दराच्या आकाराच्या उर्दू भाषेतील वर्तमानपत्राचे कटिंग करून बनवलेले एकूण १८ गठ्ठे, ए-फोर साईजचे १७ पांढºया रंगाचे कोरे कागद, एक कटर असे बनावट नोटा बनवण्याचे साहित्य सापडले. गुन्हे शाखेच्या पथकाने जियाउद्दीन अमिनसाब दुरुगकर (वय ६०, रा. ३९३, शुक्रवार पेठ, सोलापूर) याला अटक करून त्याच्याविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात भा.दं.वि.सं. क. ४८९ (अ) (क) (ड) (ई) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आज त्याला सोलापूरच्या न्यायालयात दिवाणी न्यायाधीश देशमुख यांच्यासमोर उभे करण्यात आले. पोलिसांनी तपासासाठी त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने त्यास २७ जानेवारीपर्यंत पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. ही कारवाई पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार भीमसेन जाधव, हवालदार नीलकंठ तोटदार, संजय बायस, संजय पवार, बाबर कोतवाल, आप्पासाहेब पवार, संतोष पापडे, नागेश उडाणशिवे आदींनी केली.-----------------------अशी होती गंडवण्याची यंत्रणा - संबंधित आरोपी असलेले जियाउद्दीन दुरुगकर हा गेल्या दहा वर्षांपासून बनावट नोटा तयार करायच्या. त्या व्यवहारात आणण्यासाठी गिºहाईक शोधण्यासाठी वेगवेगळ्या लोकांना कामाला लावायचा. यापोटी त्या संबंधितांना ४० टक्के रक्कम द्यायचा. संबंधित माणसे गिºहाईक शोधून त्याच्याशी डील करायचे. त्याची इत्थंभूत माहिती काढायचे आणि मगच दुरुगकर त्यांच्यासमोर जायचा आणि त्यांनी दिलेल्या खºया नोटांच्या बदल्यात तिप्पट नोटा द्यायचा. या काळात त्याचे साथीदार पैशांची देवाण-घेवाण करताना पोलीस आल्याचा आरडाओरडा करुन पलायन करायचे. आतापर्यंत त्याने अनेकांना २ लाखांपासून ते १० लाखांपर्यंत गंडवले आहे. आरोपी दुरुगकर हा पूर्वी मुंबईत मंत्रालयात कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने शिपाई म्हणून काम करायचा. त्यांतर तो सोलापुरात आला आणि त्याने हा गंडवण्याचा धंदा सुरू केल्याचे तपासात पुढे येत आहे. त्याला एकूण सहा मुली असून यातील चार जणांचा विवाह झाला आहे. एक मुलगा दहावी इयत्तेत आहे. शिवाय सहा भाऊ आणि सहा बहिणी असा त्याचा परिवार आहे.--------------------चार दिवसांपासून ठेवली होती पाळत प्रकरणाची खबºयामार्फत माहिती मिळाल्यानंतर फौजदार जाधव व त्यांच्या सहकाºयांनी चार दिवसांपासून आरोपी जियाउद्दीन दुरुगकर याच्या हालचालींवर पाळत ठेवली होती. त्याच्या घरावरही छुपा पहारा ठेवला होता. त्याच्याकडे कोण येते, जाते याची इत्थंभूत माहिती गोळा करून सोमवारी अखेर वरिष्ठांच्या परवानगीने धाड टाकली असता त्याचा कारनामा उघड झाला.लाखो रुपयांना गंडाआजवर या आरोपीने अनेकांना गंडा घातला असून पोलीस तपासात आणखी माहिती पुढे येण्याची शक्यता आहे. आजवर बनावट नोटा किती चलनात आल्या याबद्दल पोलीस कसून शोध घेत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस