शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

टँकरच्या धडकेने शाळकरी मुलगा ठार जमावाची दगडफेक: पोलिसांचा लाठीमार

By admin | Updated: May 7, 2014 00:00 IST

सोलापूर : पाण्याची वाहतूक करणार्‍या खाजगी टँकरची सायकलीस धडक लागल्याने स्विमिंगवरून घराकडे परतणारा शाळकरी मुलगा जागीच ठार झाला. ही घटना पूर्व भागातील आंध्रदत्त चौकात मंगळवारी सकाळी घडली. यामुळे संतप्त झालेल्या जमावाने टँकरवर दगडफेक केली तर गर्दीला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.

सोलापूर : पाण्याची वाहतूक करणार्‍या खाजगी टँकरची सायकलीस धडक लागल्याने स्विमिंगवरून घराकडे परतणारा शाळकरी मुलगा जागीच ठार झाला. ही घटना पूर्व भागातील आंध्रदत्त चौकात मंगळवारी सकाळी घडली. यामुळे संतप्त झालेल्या जमावाने टँकरवर दगडफेक केली तर गर्दीला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.सनी नागेश श्रीगिरी (वय १३, रा. सोलापूर) असे ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. तो सातवीत शिकत होता. शाळेला सुट्या लागल्याने मार्कंडेय तलावात तो पोहण्याचा सराव करीत होता. सकाळी ११ वा. तलावाकडून तो घराकडे जाण्यासाठी सायकलवरून निघाला. आंध्रदत्त चौकातील सिंधूराम रेसीडेन्सीसमोरील पुलावर तो आला असता, समोरून पाण्याचा टँकर (एमटीएस ८९0१) वेगाने आला. टँकरने सनी याच्या सायकलीस ठोकरले. पुढचे चाक सायकलवरून गेले. गाल व डोक्याला मार लागून तो जागीच ठार झाला. घटनेनंतर टँकरचालक पळून गेला. सनीचे वडील वायरमन म्हणून मिळेत ते काम करतात. याप्रकरणी सनी याचे वडील नागेश यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक समीर नुरोद्दीन पीरजादे (वय ३५, रा. कोंडानगर, अक्कलकोटरोड सोलापूर) याला जेलरोड पोलिसांनी अटक केली. तपास महिला फौजदार पाटील करीत आहेत. ...जमावावर पोलिसांचा लाठीमारअपघातानंतर घटनास्थळी लोकांची गर्दी जमली. संतप्त झालेल्या लोकांनी टँकरवर दगडफेक केली. माहिती मिळताच जेलरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गर्दीला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.