शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
3
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
4
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
5
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
6
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
7
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
8
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
9
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
10
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
11
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
12
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
13
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
14
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
15
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
16
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
17
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
18
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
19
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
20
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन

९ जानेवारीला पंतप्रधानांचा दौरा; सोलापुरात येणारे नरेंद्र मोदी देशाचे पाचवे पंतप्रधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2019 10:50 AM

सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यासाठी सोलापूरला येणारे नरेंद्र मोदी हे पाचवे पंतप्रधान आहेत.  पंतप्रधान नरेंद्र ...

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ९ जानेवारी रोजी सोलापूर दौरा जाहीर अद्याप पंतप्रधान मोदी यांच्या सभेचे ठिकाण निश्चित झालेले नाहीलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांचा शुभारंभ

सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यासाठी सोलापूरला येणारे नरेंद्र मोदी हे पाचवे पंतप्रधान आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ९ जानेवारी रोजी सोलापूर दौरा जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. अद्याप पंतप्रधान मोदी यांच्या सभेचे ठिकाण निश्चित झालेले नाही. होम मैदान यात्रेसाठी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या ताब्यात गेल्याने अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे पर्यायी चार जागांची पाहणी करण्यात आली आहे.

आता सुरक्षेच्या तपासणीवरून पोलिसांकडून या जागेबाबत हिरवा कंदील आल्यावर सभेचे ठिकाण निश्चित होणार आहे. सिद्धेश्वर कारखान्याजवळील जागा सर्वांना पसंत असल्याचे नगरसेवक सुभाष शेजवाल यांनी म्हटले आहे. भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजीतसिंह ठाकूर, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत शहर व जिल्हा भाजप पदाधिकाºयांची गुरूवारी शिवस्मारक येथे बैठक बोलाविण्यात आली आहे. या  बैठकीत सभेसाठी  कोणती जागा निश्चित केली हे कळणार आहे. 

पंतप्रधान मोदी यांच्या आधी चार पंतप्रधानांचा सोलापूरला दौरा झाला आहे. १२ एप्रिल १९६0 रोजी पहिल्यांदा पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू सोलापूर दौºयावर आले होते. या दौºयात त्यांनी स्टेशन चौकातील महात्मा गांधी पुतळ्याचे अनावरण केले. १९६५ मध्ये दुसºया दौºयात सेटलमेंट कॉलनीला इंग्रज सरकारने घातलेले क्षेत्रबंधन उठविले होते.

त्यानंतर १९७७ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सोलापूरचा दौरा केला होता. सोलापूर लोकसभेसाठी सूरजरतन दमाणी व पंढरपूरसाठी संदिपान थोरात हे उमेदवार होते. होम मैदानावर त्यांची सभा झाली होती. १९८७ मध्ये पंतप्रधान राजीव गांधी यांचा दौरा झाला होता. यावेळी त्यांनी सेटलमेंट कॉलनीतील रहिवाशांना मोफत नळ आणि डोणगाव रोडवरील सायकल कारखान्याचे भूमिपूजन केले होते. 

२00६ मध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग हे विडी घरकूल येथील गोदुताई परुळेकर गृहनिर्माण संस्थेच्या घरकू ल व पॉवर ग्रीडच्या शुभारंभासाठी आले होते. त्यानंतर आता पंतप्रधान मोदी सोलापूर दौºयावर येत आहेत.

गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही आले होते मोदी- गुजरातचे मुख्यमंत्री असताना विजयपूर दौºयावरून परतताना पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात आले होते. त्यानंतर गेल्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी होम मैदानावर प्रचार सभा झाली होती. याचबरोबर व्ही. पी. सिंग, चंद्रशेखर, देवेगौडा हे पंतप्रधान पदावर नसताना सोलापुरात येऊन गेले होते, हे येथे उल्लेखनीय.

टॅग्स :SolapurसोलापूरNarendra Modiनरेंद्र मोदीtourismपर्यटन