शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
7
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
8
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
9
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
10
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
11
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
12
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
13
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
14
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
15
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
16
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
17
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
18
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
19
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
20
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया

Piyush Goyal's Tweet: रेल्वे मंत्र्यांकडून बदलत्या सोलापूर रेल्वे स्टेशनचं कौतुक

By appasaheb.patil | Published: March 07, 2019 12:33 PM

आप्पासाहेब पाटील सोलापूर : रेल्वे मंत्रालयाच्या स्थानक पुनर्विकास योजनेतून सोलापूर रेल्वे स्थानकावर विविध विकासकामे करण्यात आली़ या कामांमुळे रेल्वे ...

ठळक मुद्देदेशातील शेकडो नेटकºयांकडूनही उत्साहवर्धक प्रतिक्रियारेल्वे मंत्रालयाच्या स्थानक पुनर्विकास योजनेतून सोलापूर रेल्वे स्थानकावर विविध विकासकामे रेल्वे स्थानकावर येणाºया प्रवाशांना जागतिक स्तरावरील रेल्वे स्टेशनचा अनुभव घडवून आणण्यात यश मिळवित असल्याचे टिष्ट्वट रेल्वे मंत्र्यांनी केले

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : रेल्वे मंत्रालयाच्या स्थानक पुनर्विकास योजनेतून सोलापूर रेल्वे स्थानकावर विविध विकासकामे करण्यात आली़ या कामांमुळे रेल्वे स्थानकाचे रूप पालटले आहे़ या झालेल्या कामांचे कौतुक रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी टिष्ट्वट करून केले आहे़ रेल्वे स्थानकावर येणाºया प्रवाशांना जागतिक स्तरावरील रेल्वे स्टेशनचा अनुभव घडवून आणण्यात यश मिळवित असल्याचे टिष्ट्वट रेल्वे मंत्र्यांनी केले आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या वतीने २०१८ साली सोलापूर रेल्वेस्थानकाचा समावेश स्थानक पुनर्विकासाच्या यादीत समाविष्ट करण्यात आला होता़ यासाठी सोलापूर मंडलाकडून त्याबाबतचा प्रस्ताव व करावयाची कामे याचा आराखडा मागविण्यात आला होता़ या आराखड्यानुसार रेल्वे मंत्रालयाने मंजुरी देत पाच ते सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला़ सुरुवातीला संथगतीने सुरू असलेल्या कामाने जुलै महिन्यात गती घेतली़ अवघ्या सहा ते सात महिन्यात सोलापूर रेल्वेस्थानक व परिसरात विविध विकासकामे करण्यात आली़ या कामांमुळे सोलापूर रेल्वेस्थानकाचा चेहरामोहरा बदलल्यामुळे रेल्वे स्थानक परिसरात येणाºया सर्व प्रवाशांचे आकर्षण ठरत आहे़ या विकासकामांचे फोटो टाकून रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी टिष्ट्वट करून कामाचे कौतुक केले आहे.

प्रवाशांना केंद्रबिंदू मानून रेल्वे मंत्रालयाच्या सूचनेनुसार सोलापूर स्थानकावर दिव्यांग प्रवाशांसाठी रॅम्प तर अपंग व्यक्तींसाठी लिफ्ट, वाहनांसाठी प्रशस्त रस्ते, पायी चालत जाणाºयांसाठी फूटपाथ, कोरिअन कारपेटचे लॉन, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्वतंत्र लेन, कचरा साठवणूक करण्यासाठी स्टीलचे डबे, स्थानकासमोरील पोर्चमध्ये अर्धचंद्रकार छत उभारण्यात आला, नवीन इलेक्ट्रिक ट्रेन डिस्प्ले, प्लॅटफॉर्मवर नवीन दिशादर्शक फलक, प्रवाशांसाठी वातानुकूलित प्रतीक्षा कक्ष, वायफाय इंटरनेट सुविधा, ३६ मोबाईल चार्जिंग पॉर्इंट बसविण्यात आले आहेत.

असे केले कौतुक रेल्वेमंत्र्यांनी...- सोलापूर रेल्वे स्थानकावर करण्यात आलेल्या विकासकामांचे चार फोटो पोस्ट करून ‘खुबसुरत सोलापूर रेल्वे स्टेशन, सौंदर्यीकरण और यात्री सुविधाओं के नूतनीकरण के बाद यात्रीयों एक विश्वस्तरीय स्टेशन का अनुभव कर रहा हैं’! असे टिष्ट्वट करून सोलापूर रेल्वे स्थानकावर झालेल्या विकासकामांचे कौतुक केले़ या टिष्ट्वटवरील पोस्टला बुधवारी सायंकाळपर्यंत बावीशे लोकांनी लाईक, २४४ लोकांनी कमेंट तर ६७९ लोकांनी रिटिष्ट्वट केले आहे़ यामधील कमेंटमध्ये लोकांनी ‘मेरा देश बदल रहा हैं’, मेरठ स्टेशनपर कुछ रहमु करम करवा दो, दिल्ली मेट्रोपर सफर कर लो़़़पता लग जायेगा अशा एक ना अनेक चांगल्या व तक्रारी करणाºया कमेंट केल्या आहेत़ एकाने अहमदाबाद येथील रेल्वे स्टेशनवरील असुविधा व गर्दीचा फोटो शेअर केला आहे़ 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेpiyush goyalपीयुष गोयलTwitterट्विटर