डॉक्टर दाम्पत्यांची किमया;चक्क १२ महिन्यात ७ टन पेरूने मिळाले ३ लाखाचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 11:47 AM2020-03-02T11:47:12+5:302020-03-02T11:49:48+5:30

नाही मात्रा रासायनिक खतांची...;६० गुंठ्यांत ७ टन पेरुला गोडी सेंद्रियाची

Peruvian couples get 5 lakhs in 3 months | डॉक्टर दाम्पत्यांची किमया;चक्क १२ महिन्यात ७ टन पेरूने मिळाले ३ लाखाचे उत्पन्न

डॉक्टर दाम्पत्यांची किमया;चक्क १२ महिन्यात ७ टन पेरूने मिळाले ३ लाखाचे उत्पन्न

googlenewsNext
ठळक मुद्देफळं पुणे बाजारपेठेत; देगाव (वा़) येथील लामगुंडे दाम्पत्याची यशोगाथा६० गुंठे क्षेत्रावर १५ बाय १५ अंतरावर एकूण ४०० रोपांची लागवड आजपर्यंत एकूण ७ टन फळांची विक्री केली, सरासरी दर ४० रुपये किलो मिळाला

संभाजी मोटे
वाळूज : वडिलोपार्जित ४० एकर शेती़़़पारंपरिक पिके घेऊनही गुजराण सुरु होती..वैद्यकीय सेवेतून मिळणाºया वेळेतून ६० गुंठ्यांवर पेरुची लागवड केली. क़ाटेकोर नियोजनाला प्रयोगाची जोड दिली. चक्क १२ महिन्यांत ७ टन सेंद्रिय पेरुचे उत्पादन घेण्याची किमया साधली आहे वैद्यकीय क्षेत्रातल्या एका दाम्पत्याने.

डॉ़ मिलिंद लामगुंडे आणि डी फार्मसी झालेली त्यांची पत्नी प्रमिला लामगुंडे असे त्या दाम्पत्याचे नाव़ देगाव (वा.) येथील या दाम्पत्याने आपला वैद्यकीय व्यवसाय करत ६० गुंठे क्षेत्रात पेरूची लागवड करून अडीच लाख रुपयांचे उत्पन्न घेतले.

मिलिंद यांचे वडील हेही डॉक्टर होते. वडिलांच्या पारंपरिक शेतीत काहीतरी वेगळं करण्याचा विचार या दाम्पत्याच्या मनात आला़ सर्वप्रथम त्यांनी ६० गुंठ्यांत मशागत करून जमीन चांगली करुन घेतली़ गवत काढून बाग स्वच्छ केली. त्या ६० गुंठे क्षेत्रावर १५ बाय १५ अंतरावर एकूण ४०० रोपांची लागवड केली. प्रयोगाच्या माध्यमातून सरदार पेरूची लागवड केली.

तत्पूर्वी भरपूर प्रमाणात शेणखत वापरले. ठिबक सिंचनाव्दारे पाणीपुरवठा केला. झाडांवर कुठलीही कीटकनाशक फवारणी केली नाही अथवा कुठलेही रासायनिक खत बागेला वापरले नाही. म्हणून सेंद्रिय पेरू म्हणण्यास हरकत नाही.

प्रत्यक्षात आॅक्टोबर महिन्यात पेरू तोडणीला सुरुवात झाली. आजपर्यंत एकूण ७ टन फळांची विक्री केली. सरासरी दर ४० रुपये किलो मिळाला़ ही फळं पुणे आणि सोलापूर येथील बाजार समितीला पाठविली. या लागवडीवर एकूण ३० हजार खर्च झाला. खर्च वजा करता २़५० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.

व्यस्त जीवनातही शेतीला प्राधान्य 
- डॉ़ लामगुंडे दाम्पत्याने देगाव येथे मागील १५ वर्षांपासून रुग्णांची सेवा करतात. सकाळी ९ ते १२ या वेळेत देगाव येथे तर दुपारी १ ते ५ दरम्यान मोहोळ येथे दवाखाना चालवितात. तर प्रमिला या गावातच औषध दुकान चालवितात. दोघेही आपला व्यवसाय करत शेती करतात़ वैद्यकीय क्षेत्रातले दोघेही सकाळी सहा ते आठ या वेळेत शेतामध्ये काम करतात. दुपारी तीन ते सहादरम्यान शेतात काम करतात.


वडीलही पेशाने डॉक्टर असले तरी ते खरे शेतकरी होते़ शेतीचे बाळकडू त्यांच्याकडून मिळाले. एकूण ४० एकरांत वेगवेगळ्या पिकांचे प्रयोग करीत राहिलो. पती आणि कुटुंबाच्या मदतीने ६० गुंठ्यांत ७ टन पेरुचे उत्पादन घेता आले ते केवळ प्रयोगशील कृतीमुळे़ या प्रयोगाच्या माध्यमातूनच सर्व पिके सेंद्रिय पध्दतीने घ्यावीत़ त्याला दरही चांगला मिळतो़ सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. 
- प्रमिला लामगुंडे, पेरु उत्पादक, देगाव (वा़)

Web Title: Peruvian couples get 5 lakhs in 3 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.