शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
3
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
4
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
5
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
6
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
7
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
8
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
9
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
10
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
11
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
12
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
13
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
14
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
15
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
16
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
17
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
18
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
19
PHOTOS: तूफ़ान से लड़ने में मज़ा और ही कुछ है; अभिनेत्री नव्हं 'प्रसिद्ध' अधिकाऱ्याची भटकंती
20
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा

पेरूने केले आयुष्य गोड... मिळाले हक्काचे घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2020 1:12 PM

प्रयोगशील शेतकरी; बाळू कोळी यांचा यशस्वी प्रयोग : केरळचं वाण वडवळच्या कुशीत

ठळक मुद्देएक एकरात १५ ते २० फुटावर एक रोप लावले दीड बाय दीडचा खड्डा घेऊन त्यात शेणखत, मुरूम टाकून रोपे लावली दोन वर्षांत पूर्ण झाडांची वाढ झाली व मग उत्पन्न सुरू झाले

महेश कोटीवाले 

वडवळ : शिक्षण फक्त पाचवी... पत्नीचे शिक्षण फक्त चौथी... शेती तीन एकर...  पारंपरिक शेती करत विविध जोडधंदे करण्याचा प्रयत्न केला; मात्र म्हणावे असे उत्पन्न निघतच नव्हते... नंतर  दीड एकरात पेरूची बाग करण्याचा प्रयोग केला हाच प्रयोग शेवटी यशस्वी झाला... याच पेरूमुळे  मोहोळ तालुक्यातील वडवळ येथील शेतकरी बाळू कोळी व सविता कोळी यांना कष्टाचे दिवस काढत आता गावात स्वत:चे हक्काचे घर देखील बांधता आले... पेरूमुळेच त्यांचे आयुष्य गोड झाले.

घरची एकूण तीन एकर शेती... पाच वर्षांपूर्वी भोसे ता. पंढरपूर येथील दिवंगत शेतकरी बाबुराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दीड एकर क्षेत्रात केरळ येथून  ‘सरदार’ जातीची पेरूच्या रोपांची बाग केली. एक रोप १०० रुपयाला पडले. एक एकरात १५ ते २० फुटावर एक रोप लावले. दीड बाय दीडचा खड्डा घेऊन त्यात शेणखत, मुरूम टाकून रोपे लावली. दोन वर्षांत पूर्ण झाडांची वाढ झाली व मग उत्पन्न सुरू झाले.पेरूवर पाने व शेंडे कुरतडणाºया अळीचाच फक्त त्रास. इतर कोणत्याही रोगाला बळी न पडणारी ही पेरूची जात त्यामुळे वेळोवेळी अशा अळीचा  बंदोबस्त केला, त्यामुळे हमखास उत्पन्न मिळू लागले.

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही रोपे लावल्यानंतर त्यामध्ये ज्वारी, गहू, हरभरा यासारखी आंतरपिके देखील घेतली त्यामुळे खर्च देखील वाचला. सध्या देखील गहू हे आंतरपीक असून १० ते १२ पोती गहू निघेल असा विश्वास कोळी यांनी बोलून  दाखवला.  फक्त सुरुवातीलच  केवळ चार मजूर लावून खड्डे घेणे, रोपे लावणे एवढाच मजुरी खर्च गेला नंतर मात्र या पती-पत्नीनीच संपूर्ण बाग हाताळली. पाणी देणे, पेरू तोडणे यासाठी कोणतेही मजूर न लावता हे काम सुरू आहे.

एका वर्षात दोन वेळा हे फळ येते... - सलग तीन महिने हे पेरूचे फळ मिळते...रोज किमान ४ कॅरेट पेरूचा      माल निघतो. एका कॅरेटमध्ये साधारण १५ किलो माल बसतो. वर्षभरात एकूण जवळपास ८०० कॅरेट माल निघतो. कमीत कमी ३० ते जास्तीत जास्त ४० रुपयांपर्यंत आजवर भाव मिळाला असून, वडवळ गावात कधीकधी किरकोळ विक्री तर कॅरेटमधून सोलापूर येथे हा माल विक्रीस पाठवण्यात येतो.

निसर्ग त्याच्या पद्धतीने वाटचाल करीत असतो; मात्र शेतकºयांचे जीवन याच निसर्गावर अवलंबून आहे. याचाच विचार करून पेरू हे कमीत कमी रोगाला बळी पडणारे व हमखास उत्पन्न देणारे फळपीक आहे. त्याला आंतरपिकांची जोड देत आमची देखील वाटचाल सुरू आहे. - बाळू कोळी, शेतकरी वडवळ

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीfruitsफळे