ट्रकच्या धडकेने एक ठार

By Admin | Updated: June 21, 2014 01:17 IST2014-06-21T01:17:52+5:302014-06-21T01:17:52+5:30

मोटरसायकलला ठोकरल्याने एक जागीच ठार

One killed by truck torch | ट्रकच्या धडकेने एक ठार

ट्रकच्या धडकेने एक ठार


मंद्रुप : दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरुर येथे ट्रकने समोरुन येणाऱ्या मोटरसायकलला ठोकरल्याने एक जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला़ ही घटना गुरुवारी दुपारी घडली़ चन्नप्पा सातप्पा बरुरकर (वय ५०, रा़ बरुर) असे ठार झालेल्याचे नाव आहे़
चन्नप्पा बरुरकर व जाफर अब्दुल हत्ताळी हे दोघे दुपारी किराणा माल आणण्यासाठी बरुरहून मोटरसायकल (के़ ए़ २८ जे़ ५७२४) वरुन टाकळीकडे निघाले होते़ दरम्यान बरुर फाट्यावर समोरुन येणाऱ्या ट्रकने (एम़ एच़ १२ ए़ क्यू़ ४७०८) मोटरसायकलला धडक दिली़ यावेळी मोटरसायकलवरील मागे बसलेले चन्नप्पा बरुरकर हे रस्त्यावर पडले़ ट्रकचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने ते जागीच ठार झाले तर हत्ताळी हे जखमी झाले़
अपघातानंतर ट्रकचालक ट्रक सोडून पळून गेला़ या अपघाताची माहिती मिळताच हवालदार अशोक ढवळे, रवी माने यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला़ ट्रक चालकावर मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़

Web Title: One killed by truck torch