शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

आंबे विषबाधा प्रकरणातील एकाचा मृत्यू १५९ जणांना बाधा;

By admin | Updated: May 9, 2014 00:10 IST

६३ रुग्णांना सोलापूरला हलविले

पंढरपूर : आंबे (ता. पंढरपूर) येथील दर्लिंग देवाच्या प्रसादातून विषबाधा झालेल्या दीपक कृष्णा शिंदे (वय २३) याचा गुरूवारी पहाटे सोलापुरातील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातील ८९ रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. त्यापैकी ६३ रुग्णांना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.आंबे (ता. पंढरपूर) येथील राजाराम विठ्ठल पुजारी यांच्या घरी दर्लिंग देवाच्या वालगानिमित्त सोमवारी जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्यात ३५० नागरिकांनी भोजन घेतले. यातील ३५ जणांना मंगळवारी विषबाधा झाल्याने स्थानिक रुग्णालयात त्यांनी उपचार घेतले. बुधवारी अचानक ११५ लोकांना पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवार आणि बुधवारी १५९ जणांवर उपचार सुरू होते. यातील ४० रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले. दरम्यान दीपक शिंदे याच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्याला सोलापुरातील खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.बुधवारी संध्याकाळी प्रकृतीत सुधारणा झाल्याने घरी पाठविण्यात आलेल्या रूग्णांपैकी १० जणांना पुन्हा त्रास जाणवू लागल्याने गुरुवारी सकाळी उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आणखी ३० जणांनाही मळमळ व उलटीचा त्रास होऊ लागल्याने त्यांनाही रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी पुणे आरोग्य विभागाचे सहायक संचालक डॉ. कदम यांनी रुग्णालयाला भेट देऊन पुरेसा औषधसाठा, मनुष्यबळ आदींची पाहणी केली. -----------------------------------------अन्न नमुन्यांची तपासणीबुधवारी अन्नसुरक्षा विभागाचे आर. एम. भरकड, एफ. टी. तोरम, पी. ए. यादव यांनी आंबे येथे जाऊन राजाराम पुजारी यांच्या घरी कार्यक्रमादिवशी जेवणातील लाडू, चपाती, तांदूळ, खाद्यतेल, पिण्याचे पाणी आदींचे नमुने तपासणीसाठी घेऊन पुणे येथील राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा येथे तपासणीसाठी पाठवले आहे.-------------------------------------------दुसर्‍यासाठी गेला जीवस्वत:ला विषबाधेचा त्रास होत असतानाही दीपक कृष्णा शिंदे याने सर्व रुग्णांना रुग्णालयात पोहचवण्याचे काम केले. या सर्व प्रक्रियेत अधिक वेळ गेल्याने त्याला विषबाधेचा त्रास वाढला. त्याला जादा त्रास होत असल्याचे पाहून अनिल शिंदे यालाही त्रास सुरु झाला. दोघांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दीपकचा मृत्यू झाला. अविवाहित दीपक हा पंढरपूर येथील शिक्षक सोसायटीमध्ये सेवक म्हणून नोकरीस होता. त्याला लग्नासाठी मुली बघण्याचे काम सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबावर आघात झाला. त्याच्या प›ात आई, वडील, एक भाऊ, दोन बहिणी, चुलते असा परिवार आहे.-------------------------------------------विषबाधेने दोन दिवस उपाशीपोटी असलेल्या रूग्णांच्या शरीरातील पांढर्‍या पेशी कमी होऊ लागल्या आहेत. पांढर्‍या पेशी वाढविण्याची यंत्रणा पंढरपुरात उपलब्ध नसल्याने रूग्णांना सोलापूरला हलविणे गरजेचे होते. त्यामुळे पुढील उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आले.- डॉ. पंकज गायकवाडवैद्यकीय अधीक्षक