सायकलवरुन पडून वृद्धाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:46 IST2020-12-05T04:46:01+5:302020-12-05T04:46:01+5:30

भालचंद्र शंकर घोंगडे (वय ५८, रा. वज्राबाद पेठ, सांगोला) असे मरण पावलेल्या सायकलस्वाराचे नाव आहे. पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात ...

An old man dies after falling off a bicycle | सायकलवरुन पडून वृद्धाचा मृत्यू

सायकलवरुन पडून वृद्धाचा मृत्यू

भालचंद्र शंकर घोंगडे (वय ५८, रा. वज्राबाद पेठ, सांगोला) असे मरण पावलेल्या सायकलस्वाराचे नाव आहे. पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

बुधवारी दुपारी ३.३० च्या सुमारास सांगोला- मिरज रेल्वे गेटवर ही घटना घडली.

घोंगडे हे बुधवारी दुपारी सायकलवरून राऊत मळा येथील शेताकडे निघाले होते. मिरज रेल्वे गेटच्या जवळ येताच सायकलवरून खाली पडले. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने नातेवाईकांनी उपचाराकरिता पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, पत्नी, दोन मुली , दोन भगिनी असा परिवार आहे.

Web Title: An old man dies after falling off a bicycle