शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

शाळकरी मुलांच्या सायकली चोरणाऱ्या आजोबांना अटक; CCTV मुळे झाला भांडाफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 15:45 IST

शाळा, ट्यूशन व घरासमोर लावलेल्या सायकली तो चोरत होता. सायकली चोरून तो कमी किमतीमध्ये विकत असे.

Solapur Crime : शाळकरी मुलांच्या सायकली चोरणाऱ्या ७२ वर्षाच्या वृद्धाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून विजापूर नाका पोलिस ठाणे, एमआयडीसी पोलिस ठाणे, फौजदार चावडी पोलिस ठाणे, जोडभावी पेठ पोलिस ठाणे व जेल रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरीला गेलेल्या १४ सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. शहरातून सायकल चोरीचे प्रमाण वाढले होते, त्या अनुषंगाने तपास करीत असताना एका ठिकाणी सायकल चोरून नेतानाचे फुटेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आले. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपास करून कॅमेऱ्यातील इसमाचा शोध घेतला. तेव्हा बाबूलाल शामलाल कुकरेजा याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी तपास केला असता, त्याने १४ सायकली चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून १२ दखलपात्र तर दोन अदखलपात्र असे १४ गुन्हे उघडकीस आले. ही कामगिरी पोलिस आयुक्त एम. राज कुमार, पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, सहायक पोलिस आयुक्त राजन माने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोलिस अंमलदार विजयकुमार वाळके, विद्यासागर मोहिते, तात्यासाहेब पाटील, गणेश शिंदे, उमेश पवार, चालक बाळासाहेब काळे यांनी पार पाडली. खाणे, पिणे अन् फिरणे इतकेच कामबाबूलाल कुकरेजा हा सराईत गुन्हेगार असून तो शहरातून फिरत असतो. त्याच्यावर १९८० पासून चोऱ्या, घरफोड्यांसारखे गुन्हे दाखल आहेत. सध्या वय झाल्याने तो फक्त सायकली चोरतो, त्यातून जेवणाचा, दारूचा खर्च भागवतो. त्याला स्वतः चे घर नाही, तो असाच फिरत असतो, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी दिली.

सायकल चोरून करायचा विक्रीबाबूलाल कुकरेजा हा एकटा असून, तो फिरस्ती आहे, लक्ष ठेवून तो सायकली चोरत होता. शाळा, ट्यूशन व घरासमोर लावलेल्या सायकली तो चोरत होता. सायकली चोरून तो कमी किमतीमध्ये विकत होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तो सायकल चोरताना आढळून आला होता. त्यानुसार तपास करून बाबूलाल कुकरेजा याला अटक केली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांनी दिली.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी