शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
4
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
5
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
6
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
7
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
8
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
9
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
10
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
11
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
12
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
13
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
14
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
15
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
16
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
17
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
18
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
19
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
20
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून

ओडिसा वाणाच्या शेवग्याने आठ महिन्यात मिळवून दिले अडीच लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2020 11:11 AM

एका एकरातील कमाई़; औज येथील रमेश नारोणा यांची यशोगाथा

ठळक मुद्देस्थानिक पातळीवरच्या बाजार पेठेतच शेवगा गेलाकमी खर्चात, कमी मशागतीत आणि जास्त उत्पन्न देणारे हे पीकएका शेवग्याला जास्तीतजास्त पाच रुपयांचा दर मिळाला

रेवणसिद्ध मेंडगुदले 

मंद्रुप : मुख्यपिकाबरोबर घेतलेल्या आंतरपिकानेच लाखाचे उत्पन्न देण्याची किमया औज (मं़) येथील एका शेतकºयाने साधली आहे़ मुख्यत्वे जीवामृताचा डोस दिल्याने पिकाची वाढ महत्त्वाची ठरली़ प्रयोगशील शेतीतून आठ  महिन्यात एक एकरात २़५० लाख रुपयांचे उत्पन्न शेवगा पिकाने दिले आहे.

रमेश शिवशरण नारोणा असे त्या शेतकºयाचे नाव आहे़ तीन वर्षांपूर्वी त्यांनी दोन एकरात चंदनाची लागवड केली़ या मुख्य पिकाबरोबर घेतलेल्या शेवगा या आंतरपिकानेच आठ महिन्यात भरघोस उत्पन्न मिळवून दिले आहे़ विशेषत: रासायनिक पिकाचा वापर अजिबात करण्यात आला नाही़ सेंद्रिय खताचा वापर करून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रथमत: नारोणा यांनी दोन एकरात चंदनाची ५०० झाडं लावली़  चंदनाच्या झाडाची वाढ ही १५ वर्षांनी होते. या पिकामध्ये शेवगा, लिंबू, डाळिंब, पेरू ही आंतरपिके घेतली़ आंतरपिकात शेवग्याला जास्त लक्ष केंद्रित केले़ २ सप्टेंबर २०१९ रोजी एक एकरात ओडिसा वाणाची शेवग्याची २७५ रोपं लावली़ या दोन रोपांमध्ये आठ फुटाचे अंतर ठेवले़ याच्या लागवडीसाठी सहा हजारांचा खर्च आला़ विशेषत: हे पीक घेताना जमिनीची मशागत केली़ उत्तम पीक वाढीसाठी दोन गीर गाई आणल्या आणि त्याचे शेणखत आणि गोमूत्र यांचा डोस शेवग्याला दिला. आजपर्यंत यासाठी रासायनिक खत अजिबात वापरले नाही़ आठ-आठ दिवसांनी २०० लिटरच्या ड्रममधून जीवामृत दिले़ यामुळे शेवग्याला एक प्रकारचे तुप मिळाले आणि फलधारणा चांगली झाली़ 

टणक नव्हे़़़मऊ शेवगा - ओडिसा वाणाच्या शेवग्याचे विशेषत्व असे की काढणीपर्यंत हा शेवगा मऊ राहतो़ तो टणक होत नाही़ त्यामुळे बाजारातही सहज विकला जातो़ लांब लचक आणि गर हा मऊ राहतो़ चविष्ट शेवग्याला बाजारात मोठी मागणी आहे़ सरासरी अंदाज घातला तर एका झाडाकडून १५०० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे़ 

शेवग्यासाठी कुठेही बाजारपेठेत फिरावे लागले  नाही़ स्थानिक पातळीवरच्या बाजार पेठेतच शेवगा गेला़ एका शेवग्याला जास्तीतजास्त पाच रुपयांचा दर मिळाला़ कमी खर्चात, कमी मशागतीत आणि जास्त उत्पन्न देणारे हे पीक आहे़ प्रयोगशील शेतीतून कमी जागेत भरपूर उत्पन्न घेऊ शकतो़ - रमेश नारोणाशेवगा उत्पादक, औज (मं)

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीOdishaओदिशा