शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

वेगळा विदर्भ नको; कुटुंबासारखे एकत्र राहू

By admin | Updated: June 9, 2014 00:59 IST

कवी नारायण कवठेकर : मराठी साहित्यिकांची राजकीय समज पोरकट

सोलापूर : वेगळा विदर्भ होईल का?, यावर चर्चा होईल तेव्हा मी नको, असेच म्हणेन. आपण सारे मोठ्या कुटुंबाप्रमाणे एकत्र राहू. स्वतंत्र राज्याची मागणी, ही राजकीय आहे. राजकीय लोकांना दुसरे कोणते काम नसते. म्हणूनच ते अशी मागणी करत असतात, असे स्पष्ट मत विदर्भातील ज्येष्ठ कवी नारायण कवठेकर - कुलकर्णी यांनी आज येथे व्यक्त केले.कवी दत्ता हलसगीकर स्मृती समितीच्या वतीने कवठेकर-कुलकर्णी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. पुस्कार समितीचे अध्यक्ष विवेक घळसासी यांनी आपल्या भाषणात आता विदर्भही आमच्यावर अन्याय करेल, असे वक्तव्य केले होते. तो धागा पकडून कवठेकर - कुलकर्णी यांनी वेगळ्या विदर्भाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, वेगळ्या विदर्भाची मागणी होत असतानाच आता वेगळ्या मराठवाड्याचीही मागणी झाली आहे. एका धरणाच्या पाण्यासाठी झालेल्या आंदोलनात चाळीस एक आंदोलनकर्त्यांनी ही मागणी केली होती. चाळीसचे चारशे होण्याला वेळ लागणार नाही. या मागणीलाही जोर धरला जाईल.आपण जी भाषा बोलतो, तिची अवस्था आज चिंताजनक आहे. ही भाषा बहुसंख्यांनी बोलली पाहिजे. नवी दिल्लीत मराठीचा स्वर बुलंद झाला पाहिजे, असे स्पष्ट करून कवठेकर - कुलकर्णी म्हणाले, विदर्भावर अन्याय होतो म्हणजे काय? अन्याय आम्ही करू देतो. विदर्भातील लोक आळशी आहेत, असाही एक आरोप होतो; पण आम्ही सुखी आहोत म्हणून आळशी आहोत, अशीही टिपण्णी त्यांनी केली. विदर्भावर हिंदी भाषेचा प्रभाव आहे; पण मराठी बोलू नका, असे कुणी सांगितले आहे काय? संस्कार फक्त मातृभाषेतूनच होत असतात. अन्य कोणत्याही भाषेतून नाही, असे ते म्हणाले.सामान्य माणूस राजकारणविरहित राहू शकत नाही. कवीचेही तसेच आहे. राजकारण ही समाज आणि व्यक्तीजीवनावर प्रभाव टाकणारी संस्था आहे. तिची प्रतिक्रिया व्यक्त करणे, हा कवीचाही भाव असतो. त्यामुळे राजकारणाचे अनुभव कविता, कादंबरीत आले पाहिजेत; मात्र आपल्या साहित्यिकांची राजकीय समज पोरकट आहे, अशी टीका त्यांनी केली.-------------------------------------------काव्यक्षेत्रात बाजारपाऊस, चांदणे, ढग हे कवितांचे विषय आहेत. पाऊस पडू लागता की कवीच्या भावना दाटून येतात.डोळ्यातून आसवं घळघळू लागतात; पण पाऊस जर जीवन उद्ध्वस्त करत असेल तर पावसावर कविता कशी लिहिणार? असा सवाल करून काव्यक्षेत्रात बाजार मांडला आहे. पैसे देवून काव्यसंग्रह छापून घेतले जातात. पुरस्कार मिळविले जातात. या कवींना तुकाराम आणि नरेंद्रचे नाव घेण्याचा काय अधिकार, असाही प्रश्न कवठेकर - कुलकर्णी यांनी उपस्थित केला.