शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मुलाखत ; एफआरपीपेक्षा जादा दर हा सरकारचा प्रश्न नाही : सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 19:39 IST

सोलापूर : एफआरपीपेक्षा जादा दर द्यावा या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे़, पण तो सरकारचा प्रश्न येत ...

सोलापूर : एफआरपीपेक्षा जादा दर द्यावा या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे़, पण तो सरकारचा प्रश्न येत नाही असे स्पष्टीकरण राज्याचे सहकार,पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले़ राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाला सुरूवात झाली आहे़ दरवर्षीप्रमाणे यंदाही ऊस दराचा तिढा कायम आहे. शेतकरी संघटनेच्या आंदोलनाबाबत शासनाची असलेली भूमिका याबाबत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी साधलेला संवाद...

प्रश्न : ऊसदराबाबतच्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाबाबत काय सांगाल ?सहकारमंत्री : केंद्र व राज्य सरकारने ठरविलेल्या एफआरपीप्रमाणे दर देणे हे सर्व साखर कारखानदारांना बंधनकारक आहे़  एफआरपीपेक्षा जादा दर देणे कोणत्या कारखान्याला परवडत असेल तर त्यांना तसा दर देण्याबाबत परवानगी दिली जाईल. नव्याने सुरू झालेल्या खाजगी कारखान्यांना एफआरपीपेक्षा जादा दर देणे शक्य शक्य होत असेल, पण सहकारी कारखान्यांवरचा इनकम टॅक्स व इतर भार पाहिला तर सध्याच्या स्थितीत हे शक्य होणार नाही असे चित्र आहे. 

प्रश्न : गुजरात पॅटर्नप्रमाणे ऊसबिल देणे शक्य आहे का ?सहकारमंत्री :  ऊस घातल्यानंतर साखर कारखाने तीन हप्त्यात बिल देतात. गुजरात पॅटर्नप्रमाणे साखर कारखान्यांनी ऊसबिल १४ दिवसाच्या आत एकदाच द्यावे अशी शेतकºयांची मागणी आहे. मात्र कारखानदारांची परिस्थिती पाहता हे शक्य नाही़  उत्पादित साखरेला लगेच बाजारपेठ मिळत नाही़  त्यामुळे एफआरपी व उसबील वाटपाच्या मागणीबाबत शेतकरी व साखर कारखाना या दोघांचेही हित पाहणे गरजेचे आहे.

प्रश्न :  मागील एफआरपी थकीत असल्यामुळे चालू गळीत हंगामात किती कारखान्यांना गाळप परवाना दिला ?सहकारमंत्री :  गेले दोन दिवस दिवाळी सुटी असल्याने नवीन माहिती हाती आलेली नाही. पण सोलापूर जिल्ह्यातील सिध्देश्वर व मातोश्री साखर कारखान्यांबाबत तक्रार होती, चौकशी केली असता मातोश्रीने बिले वाटप केले आहे तर सिध्देश्वरला कर्ज मिळाले आहे. सिध्द्धेश्वर साखर कारखान्याकडून सोमवारपासून बिल वाटप करण्यात येणार आहे.

प्रश्न : ऊस दराबाबत शासनाची काय भूमिका असेल ?सहकारमंत्री :  उस दराबाबत शेतकºयांच्या मागणीला प्राधान्य दिले आहे़ पण शेतकºयांच्या हिताबरोबर साखर कारखानदारी टिकली पाहिजे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शेतकºयांच्या पेमेंटला प्राधान्य दिले पाहिजे, पण कारखानदारांना साखर उत्पादीत केल्यावर लगेच उचल मिळत नाही. प्रत्येक कारखानदार आप आपल्यापरीने बिल देत आहे. ज्या कारखान्यांनी बिल थकविले आहे, त्यांची माहिती घेतली जाईल.  

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुखSugar factoryसाखर कारखानेRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी