शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

सोलापुरात आढळली ‘टॅरांटूला’ कोळ्याची नवीन प्रजाती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 12:38 IST

पाच वर्षांचा अभ्यास : भारतीय वन्यजीव संस्थेने केले संशोधन

ठळक मुद्देबोरामणीच्या मोठ्या परिसरात पक्षी अणि प्राणी जसे की माळढोक, तणमोर लांडगा, कोल्हा, खोकड, काळवीट असे अनेक प्राणी आणि पक्षी आहेतबोरामणीसारख्या जागा वाचविण्याची नितांत गरज आहे. माळरान म्हणजे पडिक जमीन असा अनेकांचा समज आहे. पण, जंगलाइतकेच माळरानाचंही महत्त्व आहे

सोलापूर : डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेच्या माध्यमातून झालेल्या संशोधनात सोलापुरातील माळरानावर ‘टॅरांटूला’ या कोळ्याच्या नवीन प्रजातीचा शोध लागला आहे. या नव्या प्रजातीचे नाव आयडीओप्स वानखेडे असे ठेवण्यात आले आहे. भारतीय वन्यजीव संस्थेचे मागील पाच वर्षांपासून देशभरात कोळी किड्याविषयी संशोधन सुरु होते. या संशोधनात सोलापुरातही एका वेगळ्या कोळीचा शोध लावण्यात तज्ज्ञांना यश आले आहे. या संशोधनाला पाच वर्षांचा अवधी लागला. 

सोलापुरात संशोधन करण्यासाठी भारतीय वन्यजीव संस्थेचे पथक २०१५ मध्ये सोलापुरात आले होते. मानद वन्यजीव रक्षक डॉ. निनाद शहा यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंद कला व विज्ञान महाविद्यालयाचे डॉ. राजशेखर हिप्परगी, प्रसाद बोलदे, श्रीपाद मंथेन यांचा या संशोधनात महत्त्वाचा वाटा आहे. बोरामणी, तुळजापूरपर्यंतचे माळरान, अक्कलकोट रोड, विजापूर रोड, सिद्धेश्वर वनविहार येथे संशोधनासाठी सर्वेक्षण करण्यात आले. सोलापुरात माळरान असल्यामुळे संशोधनासाठी सोलापुरला महत्त्व देण्यात आले. सोलापुरात सापडलेल्या टॅरांटूला (ट्रॅप डोअर स्पायडर) या कुटुंबातील ह्यआयडीओप्स वानखेडेह्ण हा कोळी माळरानावर सापळा (जाळे) लावतो. जाळ्यामध्ये दुसरा कुठला जीव अडकतो का, याची वाट पहातो. एखादा किडा जाळीला स्पर्श केला की हा कोळी तिथे जाऊन त्याला खातो. हा कोळी शेतकºयांसाठी फायद्याचा असून, झाडाच्या मुळांना लागणाºया किड्यांना खातो. 

प्रजातीस आयडीओप्स वानखेडे नाव का?अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठात प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख असलेले डॉ. गणेश वानखेडे यांनी काम केले होते. अभ्यास व संशोधनासाठी त्यांनी कोळी हा विषय निवडला. त्यांनी देशभर फिरून कोळ्यांच्या सहाशे प्रजाती शोधून काढल्या. सोलापुरातील डॉ. राजशेखर हिप्परगी यांना डॉ. वानखेडे यांनी मार्गदर्शन केले होते. कोळीच्या संशोधनासाठी ते सोलापुरात येऊन गेले होते. म्हणून नव्याने सापडलेल्या या प्रजातीस आयडीओप्स वानखेडे नाव देण्यात आले.

बोरामणीच्या मोठ्या परिसरात पक्षी अणि प्राणी जसे की माळढोक, तणमोर लांडगा, कोल्हा, खोकड, काळवीट असे अनेक प्राणी आणि पक्षी आहेत. म्हणून बोरामणीसारख्या जागा वाचविण्याची नितांत गरज आहे. माळरान म्हणजे पडिक जमीन असा अनेकांचा समज आहे. पण, जंगलाइतकेच माळरानाचंही महत्त्व आहे.- डॉ. राजशेखर हिप्परगी, संशोधक, सोलापूर

टॅग्स :Solapurसोलापूरenvironmentपर्यावरण