अजित 'दादां'ची सोलापुरात वेगळीच खेळी, प्रणिती शिंदेंविरुद्ध राष्ट्रवादीची बंडखोरी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 16:36 IST2019-10-04T15:56:28+5:302019-10-04T16:36:28+5:30

भारत भालके यांच्या विरोधातील कुरघोड्यांना प्रत्यूत्तर

NCP's official revolt against Praniti Shinde! | अजित 'दादां'ची सोलापुरात वेगळीच खेळी, प्रणिती शिंदेंविरुद्ध राष्ट्रवादीची बंडखोरी !

अजित 'दादां'ची सोलापुरात वेगळीच खेळी, प्रणिती शिंदेंविरुद्ध राष्ट्रवादीची बंडखोरी !

सोलापूर : सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष जुबेर बागवान यांनी गुरुवारी ए-बी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. 

राष्ट्रवादीच्या या पावित्र्याने काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे पंढरपूर मतदारसंघातील उमेदवार आमदार भारत भालके यांच्या विरोधात काँग्रेसने शिवाजीराव काळुंगे यांना ए-बी फॉर्म दिला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी थेट आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात अर्ज दाखल काँग्रेसला काटशह दिला. 

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या आदेशाने हे पाऊल उचलण्यात आल्याचे पदाधिका?्यांकडून सांगण्यात आले. राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष संतोष पवार म्हणाले, शहर मतदारसंघात राष्ट्रवादीला मानणारा वर्ग आहे. जुबेर बागवान यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी मुस्लिम समाजातील विविध संघटनांनी केली होती. त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.

Web Title: NCP's official revolt against Praniti Shinde!