भाजप सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन; दोन टन कांद्याचे मोफत वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 14:27 IST2018-12-07T14:26:52+5:302018-12-07T14:27:49+5:30
सोलापूर : भाजप सरकारच्या काळात राज्यातील शेतकºयांच्या शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे़ भाजप सरकारच्या शेतकरी विरोधी ...

भाजप सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन; दोन टन कांद्याचे मोफत वाटप
सोलापूर : भाजप सरकारच्या काळात राज्यातील शेतकºयांच्या शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे़ भाजप सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध नोंदविण्यासाठी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले़ यावेळी राष्ट्रवादीने दोन टन कांद्याचे नागरिकांना मोफत वाटप करून भाजप सरकारचा निषेध केला.
प्रारंभी शहराध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. भाजप सरकारचा धिक्कार असो,कांदा उत्पादक शेतकºयांच्या डोळ्यात पाणी आणणारे भाजप सरकार मुदार्बाद, फडणवीस सरकारचा निषेध असो, कांदा उत्पादक शेतकºयांना भरपाई मिळालीच पाहिजे आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
याप्रसंगी प्रशांत बाबर, रमीज कारभारी, चिंतामणी सपाटे, अजित पात्रे, अहमद मासुलदार, विवेक फुटाणे, रियाज अत्तार, जहीर गोलंदाज, अल्ताफ कुरेशी, राहुल वाल्मिकी, विशाल झळके, अंबादास हजारे, सलमान शेख, सागर चव्हाण, महेश पवार, कल्पेश गायकवाड, पिंटू जक्का, अरुण गोगुलु, मुजमिल तांबोळी, रोहन उडानशिव, विक्रांत खुने, खालिद जमखंडी यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.