शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

नवरात्रोत्सवात रूक्मिणीमातेला आकर्षक पोशाखात सजविण्यासाठी अलंकार गाठविण्याचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2018 12:08 PM

मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी : रुक्मिणीमातेला असणार आकर्षक पोशाख

ठळक मुद्देनवरात्रोत्सवानिमित्त नऊ दिवस रुक्मिणीमातेला वेगळे रूप देण्याचे कामश्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन १० दिवसांपासून सुरू असलेली स्वच्छता व गाठविण्याचे काम रविवारी पूर्ण

पंढरपूर : नवरात्रोत्सव दोनच दिवसांवर आला असून, या उत्सवात रुक्मिणीमातेला विविध रूपात सजविले जाते. त्यामुळे या सजावटीदरम्यान घालण्यात येणाºया पारंपरिक आकर्षक दागिन्यांची गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेली स्वच्छता व गाठविण्याचे काम रविवारी पूर्ण झाले.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्याचबरोबर विठ्ठल- रुक्मिणीमातेला आकर्षक पोशाख घालण्यात येतो़ तसेच रोज विविध प्रकारची रुपे देऊन दागिनेही घालण्यात येतात. हे दागिने व्यवस्थित राहावेत, सुंदर दिसावे यासाठी नवरात्रोत्सव सुरू होण्यापूर्वी त्यांची स्वच्छता करून पुनर्गठित करण्याचे काम मंदिर समितीकडून प्रत्येक वर्षी केले जाते. विठ्ठलास घालण्यात येणाºया दागिन्यांमध्ये ४५ दागिन्यांचा सहभाग आहे.

यामध्ये लहान व मोठा लाफ्फा, कौस्तुभ मणी, बाजीराव कंठी, मोत्यांचा कंठा, मोर मंडोळी, मोहराची माळ, पुतळ्याची माळ, बोरमाळ यासह अन्य दागिन्यांचा समावेश आहे. तसेच रुक्मिणीमातेलादेखील ४५ ते ५० दागिने घालण्यात येतात. यामध्ये खड्याची वेणी, लहान-मोठा मणी, मोत्यांचे मंगळसूत्र, पाचोची गरसोळी, जडावाचा हार, नवरत्नाचा हार, मोहराची माळ, पुतळ्याची माळ, सोन्याचे गोठ, सोन्याचे पैंजण, मोत्याची बिंदी यासह अन्य दागिन्यांचा समावेश आहे. हे सर्व दागिने गाठून घेण्याचे काम व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या समक्ष पटवेकरी व सोनार यांनी मंदिरात केले आहे.

रुक्मिणीमातेला प्रत्येक दिवशी असते वेगळे रुप- नवरात्रोत्सवानिमित्त नऊ दिवस रुक्मिणीमातेला वेगळे रूप देण्याचे काम मंदिर समितीच्या पुजाºयांकडून होते. यामध्ये कमलादेवी, सरस्वती, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजाभवानी, पसरती बैठक, ललित पंचमी, कन्याकुमारी यासह अन्य रूपांचा समावेश असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व नित्योपचार विभागाचे प्रमुख अतुल बक्षी यांनी दिली.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpurपंढरपूर