Video - साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास करून नाशिकची सायकलवारी पंढरीत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 12:16 PM2019-06-30T12:16:18+5:302019-06-30T12:33:00+5:30

तब्बल साडेतीनशे किलोमीटरचे अंतर पार करत नाशिकची सायकलवारी रविवारी (30 जून) सकाळी 11 वाजता पंढरपुरात दाखल झाली आहे.

Nashik Pandharpur cycle Wari reach at pandharpur video | Video - साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास करून नाशिकची सायकलवारी पंढरीत दाखल

Video - साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास करून नाशिकची सायकलवारी पंढरीत दाखल

Next
ठळक मुद्देसाडेतीनशे किलोमीटरचे अंतर पार करत नाशिकची सायकलवारी रविवारी सकाळी पंढरपुरात दाखल झाली आहे.सायकल वारीमध्ये 700 जणांचा सहभाग असून त्यात 15 डॉक्टर, 100 महिला आणि तीन अंध व्यक्ती आहेत.सायकल चालवा पर्यावरण वाचवा हा संदेश घेऊन ही सायकल वारी प्रतिवर्षी आषाढी यात्रेसाठी पंढरपूर येते.

पंढरपूर - तब्बल साडेतीनशे किलोमीटरचे अंतर पार करत नाशिकची सायकलवारी रविवारी (30 जून) सकाळी 11 वाजता पंढरपुरात दाखल झाली आहे.

नाशिकच्या या सायकल वारीमध्ये 700 जणांचा सहभाग असून त्यात 15 डॉक्टर, 100 महिला आणि तीन अंध व्यक्ती आहेत. सायकल चालवा पर्यावरण वाचवा हा संदेश घेऊन ही सायकलवारी प्रतिवर्षी आषाढी यात्रेसाठी पंढरपूर येते. या वारीचे यंदाचे हे आठवे वर्ष आहे.

नाशिकहुन निघालेल्या सायकलवारीचा दीडशे किलोमीटर अंतर पार करून पहिला मुक्काम नगर येथे त्यानंतर पुन्हा दीडशे किलोमीटर अंतर पार करून दुसरा मुक्काम टेंभुर्णी येथे करून आज सकाळी पंढरीत ही सायकल वारी दाखल झाल्याची माहिती डॉ. गणेश कोळपे यांनी दिली आहे. 

 

Web Title: Nashik Pandharpur cycle Wari reach at pandharpur video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.