'माझा काका माझ्यासाठी खंबीर, मी गोरगरीब जनतेसाठी मागतोय'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 23:04 IST2019-01-30T22:54:24+5:302019-01-30T23:04:58+5:30
राज्यभर निर्धार परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून संभांचे आयोजन करण्यात आले आहे.

'माझा काका माझ्यासाठी खंबीर, मी गोरगरीब जनतेसाठी मागतोय'
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा गटनेते अजित पवार यांनी माझा काका माझ्यासाठी खंबीर असल्याचं म्हटलंय. आम्ही गोरगरीब जनतेसाठी मागतोय. गरिबांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची निर्धार परिवर्तन यात्रा सध्या सोलापूर दौऱ्यावर आहे. सोलापुरातील अकलूज येथील सभेत बोलताना अजित पवारांनी माझा काका लय खंबीर असल्याचं म्हटले.
राज्यभर निर्धार परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून संभांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात जाऊन राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक भाजपा-शिवसेना सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत. तसेच, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि तरुणाईच्या रोजगारीचा मुद्दा आपल्या सभेचा युएसपी बनवत आहेत. बुधवारी निर्धार परिवर्तनाचा यात्रा सोलापुरात पोहोचली असून माढा लोकसभा मतदारसंघातील अकलूजमध्ये परिवर्तन यात्रेच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी बोलताना अजित पवार यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी सोलापुरातील भाजपा नेत्यांनाही अजित पवार यांनी चिमटे काढले. त्यासोबच, सगळे म्हणतात अजित पवार लय बोलतोय. पण मी माझ्यासाठी नाही, तर गरिबांसाठी बोलतोय. माझा काका माझ्यासाठी लय खंबीर आहे, आम्ही केवळ जनतेसाठी अन् गोरगरिबांसाठी मागणी करतोय. गरिबांच्या न्यायायासाठी आमची लढाई सुरू असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय.