विवाहित प्रेयसीच्या पतीला केले खलास; दहिटण्यातील खून अनैतिक संबंधातून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 15:13 IST2021-03-10T14:54:43+5:302021-03-10T15:13:28+5:30

दोस्त दोस्त ना रहा...प्यार प्यार ना रहा...!

Murder of a friend who got off a bike with a friend in an immoral relationship | विवाहित प्रेयसीच्या पतीला केले खलास; दहिटण्यातील खून अनैतिक संबंधातून...

विवाहित प्रेयसीच्या पतीला केले खलास; दहिटण्यातील खून अनैतिक संबंधातून...

सोलापूर : मित्राबरोबर दुचाकीवरून बाहेर पडलेल्या मार्केट यार्डातील मजूर सलीम राजअहमद शेख (वय ३२, रा. कुमार स्वामीनगर, शेळगी) याचा खून झाला.  मंगळवारी सायंकाळी उघडकीस आले. दहिटणे-बक्षीहिप्परगा रोडवरील घोडेपीर दर्ग्यासमोर ही घटना घडली. पोलिस तपासानंतर सलीमचा खून हा अनैतिक संबंधातून झाल्याचे समोर आले, असे पोलिसांनी सांगितले. 

सलीम शेख आणि पत्नी गुलनाज शेख हे दोघे मंगळवारी सकाळी मजुरीसाठी मार्केट यार्डात गेले. तेथील काम आटोपून दुपारी साडेबारा वाजता दोघे घरी परतले. जेवण आटोपून सलीम हा टीव्हीवरील कार्यक्रम पाहत बसला होता. दुपारी अडीच वाजता दुचाकीवरून मित्र आल्याने सलीम हा घराबाहेर आला. सलीमच्या बायकोचे शेळगी परिसरात राहणाऱ्या नबीलाल रजाक शेख (रा. मित्रनगर, शेळगी) याच्यासोबत ओळख झाली. ओळखीतून त्या दोघांमध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. अनैतिक संबंधाची माहिती सलीम त्याच्या आईला झाली आणि त्यांनी सुनेला तसे वागू नको म्हणून समजूत काढली. मात्र, नबिलाल याला त्याची माहिती मिळाली आणि त्याने सलीमचा खून केला, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. जोडभावी पेठ पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Murder of a friend who got off a bike with a friend in an immoral relationship