आमदार भारत भालकेंची प्रकृती चिंताजनकच; रूबीच्या डॉक्टरांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 17:19 IST2020-11-27T17:19:07+5:302020-11-27T17:19:53+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग

आमदार भारत भालकेंची प्रकृती चिंताजनकच; रूबीच्या डॉक्टरांची माहिती
सोलापूर : आमदार भारत भालके यांची तब्येत गंभीर असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशी अधिकृत माहिती आत्ता डॉक्टरांनी दिली. रूबी हॉल क्लिनिक बाहेर त्यांच्या तब्येतीबद्दलचे पहिले मेडिकल बुलेटीन दुपारी साडेचार वाजता प्रसारित करण्यात आले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार , पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी रुबी हॉल मध्ये येउन आमदार भालके यांना पाहिले तसेच डॉक्टरांकडून त्यांच्या तब्येतीबाबतची माहिती घेतली. त्याचवेळी रूपाताई चाकणकर यांच्यासह आदी अनेक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये येऊन विचारपूस केली.
दरम्यान साडेचार वाजता प्रचंड गर्दी झाल्याने स्वतः डॉक्टरांनी बाहेर येऊन माहिती दिली. आ. भालके यांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, ते व्हेंटिलेटरवर आहेत तथापि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत असे सांगितले. या ठिकाणी कार्यकर्त्यांची आणि पत्रकारांची प्रचंड गर्दी झाली आहे. पंढरपुरातून ही अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांची झुंबड रुबी हॉल च्या समोर उडाली दिसत आहे . प्रत्येक जण भालके यांच्या निरामयतेची आणि त्यांच्या सुखरूप परत देण्याची प्रार्थना करीत आहे.