शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य कर्मचार्‍यांच्या ७ दुरुस्ती मागण्या मान्य ग्रामविकास मंत्री: मुंबईत बैठक

By admin | Updated: May 7, 2014 00:10 IST

सोलापूर: जि. प. आरोग्य कर्मचार्‍यांच्या बदलीबाबतच्या सात दुरुस्ती मागण्या तत्त्वत: मान्य झाल्या असून, याबाबतचा आदेश २० मेपर्यंत निघण्याची शक्यता आहे.

सोलापूर: जि. प. आरोग्य कर्मचार्‍यांच्या बदलीबाबतच्या सात दुरुस्ती मागण्या तत्त्वत: मान्य झाल्या असून, याबाबतचा आदेश २० मेपर्यंत निघण्याची शक्यता आहे. रविवारी (दि. ४) ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, सचिव एस. एस. संधू, उपसचिव रहाटे, संघटनेचे राज्याध्यक्ष महेश जाधव, मुख्य सचिव शिवाजी गवई, कोषाध्यक्ष पी. जी. वैष्णव, राजेंद्र माशाळ, श्रीमती कमठाणे, शिवाजी घुगे, शरद बडे, मोहन गायकवाड, प्रशांत पाटील, सतीश कांबळे, शेखर शिंदे यांच्यासह जिल्हाध्यक्षांची बैठक झाली. बैठकीत तालुक्यांतर्गत प्रशासकीय व विनंती बदलीसाठी सेवक/सेविकेची आस्थापना यापुढे उपकेंद्रच ठेवावी, प्रशासकीय बदली झालेल्यांना तालुक्यात वापसी-आपसी बदली रिक्त जागेनुसार मिळावी, तालुक्याबाहेर प्रशासकीय बदली होऊ नये, प्रशासकीय बदलीमध्ये पती-पत्नी एकत्रीकरण हा मुद्दा प्राधान्याने समाविष्ट करावा, पर्यवेक्षक यांच्या बदलीची टक्केवारी जिल्हास्तरावर वापरण्यात यावी, तालुक्यांतर्गत बदल्यासाठी सहायक/सहायिका या संवर्गासाठी २० टक्के मिळाव्यात, या मागण्या तत्त्वत: मान्य करण्यात आल्या आहेत. शिवाय जिल्हा बदली, जिल्‘ांतर्गत, तालुक्यांतर्गत विनंती बदलीसाठी पात्रतेचा निकष ५ वर्षांवरून एक वर्ष करण्याविषयी सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन मंत्री आणि सचिवांनी दिले. शिवाय गेल्या दोन महिन्यांपासून कर्मचार्‍यांचा पगार झाला नाही, याविषयी सचिव एस. एस. संधू यांनी तीन दिवसांत निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन संघटनेला दिल्याचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.