शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे एक कोटीवर मेट्रिक टन गाळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 11:50 AM

सोलापूर : सोलापूर जिल्हा यंदाही ऊस गाळपात राज्यात प्रथम असून ३१ साखर कारखान्यांचे बुधवारपर्यंत एक कोटी ६६ हजार ५७९ ...

ठळक मुद्दे सोलापूर जिल्हा यंदाही ऊस गाळपात राज्यात प्रथमअहमदनगर जिल्हा राज्यात दुसºया क्रमांकावर कोल्हापूर जिल्हा तिसºया क्रमांकावर आहे

सोलापूर : सोलापूर जिल्हा यंदाही ऊस गाळपात राज्यात प्रथम असून ३१ साखर कारखान्यांचे बुधवारपर्यंत एक कोटी ६६ हजार ५७९ मे.टन गाळप झाले आहे.  ६७ लाख ५८ हजार ३०५ मे.टन गाळप करून अहमदनगर जिल्हा राज्यात दुसºया क्रमांकावर तर ६५ लाख ४४ हजार ५७३ मे. टन गाळप करणारा कोल्हापूर जिल्हा तिसºया क्रमांकावर आहे.

राज्यातील साखर कारखान्यांचे गाळप एक नोव्हेंबरपासून सुरू झाले. ऊसदराच्या प्रश्नांमुळे कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील साखर कारखाने थोड्या उशिराने सुरू झाले; मात्र सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखाने मागील सव्वादोन महिन्यापासून पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. जिल्ह्यात यावर्षी प्रथमच ३१ साखर कारखान्यांचे गाळप सुरू आहे. मागील वर्षी ३० साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. यावर्षी गोकुळ माऊली हा साखर कारखाना नव्याने गाळप हंगाम घेत आहे.  बुधवार दिनांक ९ जानेवारीपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ३१ साखर कारखान्यांनी एक कोटी ६६ हजार ५७९ मे.टन गाळप तर ९९ लाख २९ हजार १५ क्विंटल साखर तयार झाली आहे. साखर उतारा सरासरी ९.८६ टक्के इतका मिळाला आहे. राज्यात सोलापूर जिल्हा ऊस गाळपात अव्वल ठरला आहे.शेजारच्या अहमदनगर जिल्ह्यातील २३ साखर कारखान्यांचे ६७ लाख ५८ हजार ३०५ मे.टन गाळप तर ७१ लाख ९ हजार ४३५ क्विंटल साखर तयार झाली आहे. राज्यात अहमदनगर जिल्ह्याचे ऊस गाळप दुसºया क्रमांकाचे आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन-तीन कारखाने वगळता अन्य साखर कारखाने १२ नोव्हेंबरनंतर सुरू झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील २२ कारखान्यांनी ६५ लाख ४४ हजार ५७३ मे.टन गाळप झाले आहे. ७७ लाख ३८ हजार ६२० क्विंटल साखर तयार झाली असून ११.८२ टक्के उतारा पडला आहे. गाळपात कोल्हापूर जिल्हा राज्यात तिसरा आहे. 

 शिंदेने १० लाखांचा टप्पा ओलांडलाच्माढा तालुक्यातील पिंपळनेरचा विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना १० लाख १२ हजार २४० मे.टन गाळप करून राज्यात प्रथमस्थानी आहे. कोल्हापूरचा जवाहर कारखाना ६ लाख ७२ हजार ३५० मे.टन. गाळप करून दुसºया,  इंदापूर सहकारी ६ लाख ३८ हजार ९१० मे.टन गाळप करून तिसºया तर बारामती अ‍ॅग्रो ६ लाख २९  हजार ९३५ मे.टन गाळप करून चौथ्या क्रमांकावर आहे. आमचा कारखान्याचे यावर्षी २० लाख मे. टन गाळप होईल. कारखाना १५ मार्चपर्यंत सुरू राहील असा अंदाज आहे. कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे गाळप केल्याशिवाय कारखाना बंद करणार नाही.-आर.एस.रनवरे, कार्यकारी संचालक,विठ्ठलराव शिंदे कारखाना

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेPuneपुणेAhmednagarअहमदनगरkolhapurकोल्हापूर