Maratha Reservation: सोलापुरातील मराठा समाज आक्रमक; आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 12:50 IST2021-05-05T12:47:10+5:302021-05-05T12:50:12+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग

Maratha Reservation: सोलापुरातील मराठा समाज आक्रमक; आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
सोलापूर - मराठा समाजाला दिलेले आरक्षण रद्द करण्याबाबतचा निकाल सुप्रीम कोर्टानं रद्द केले. या निषेधार्थ सोलापुरातील काही मराठा समाज बांधवांनी छत्रपती शिवाजी चौकात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, मात्र आंदोलनस्थळी पोहोचताच आंदोलनकर्त्यांना सोलापूर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले.
यावेळी माऊली पवार यांनी सरकार व कोर्टाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. धिक्कार असो...धिक्कार असो राज्य व केंद्र शासनाचा धिक्कार असो अशी घोषणाबाजीही माऊली पवार यांनी केली. यावेळी भाऊ रोडगे यांच्यासह अन्य आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध ठिकाणी आंदोलन होणार असल्याचे चित्र दिसू लागताच सोलापूर शहर पोलिसांनी विविध चौकात पोलिसांचा बंदोबस्त वाढविला असल्याचे सांगण्यात आले.