सोलापुरातील राष्ट्रवादीचे माजी महापौर मनोहर सपाटे यांना पोलिसांनी केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2021 04:21 PM2021-10-15T16:21:36+5:302021-10-15T16:21:41+5:30

मनोहर सपाटे यांचे सुपुत्र बाबासाहेब सपाटे हा फरार असल्याचेही पोलिसांनी सांगितले. 

Manohar Sapate, former mayor of Solapur, was arrested by the police | सोलापुरातील राष्ट्रवादीचे माजी महापौर मनोहर सपाटे यांना पोलिसांनी केली अटक

सोलापुरातील राष्ट्रवादीचे माजी महापौर मनोहर सपाटे यांना पोलिसांनी केली अटक

Next

सोलापूर : लॉजवरील वादाचे रूपांतर हाणामारीत आणि त्यानंतर जातिवाचक शिवीगाळीत झाल्याने, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे  माजी महापौर मनोहर सपाटे व त्यांचे पुत्र बाबासाहेब सपाटे यांच्यावर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती सहाय्यक पोलिस आयुक्‍त माधव रेड्डी  यांनी दिली. मनोहर सपाटे अटकेत असून बाबासाहेब सपाटे हा फरार असल्याचेही पोलिसांनी सांगितले. 

यातील फिर्यादी किरण साळवे हे सपाटे यांच्या शिव-पार्वती लॉजवर मॅनेजर आहेत. गुरुवारी (ता. 14) पहाटे एक-दोनच्य सुमारास ही मारहाण झाली. त्याची माहिती समजताच सपाटे हे त्या ठिकाणी पोचले. त्यांनी दोघांचे भांडण सोडवले. शुक्रवारी सकाळी आपण बघू, असेही त्यांनी सांगितले होते. तरीपण साळवे यांनी थेट दोघांवर अ‍ॅट्रॉसिटीची फिर्याद दिली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्या वेळी बाबासाहेब सपाटे यांनी साळवे यांना जातिवाचक शिवीगाळ केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर किरण साळवे यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुरुवारी  धाव घेतली.

 

Web Title: Manohar Sapate, former mayor of Solapur, was arrested by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app