Vidhan Sabha 2019 : म्हेत्रे, शिंदे यांचा भाजप प्रवेश निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 04:10 AM2019-09-21T04:10:33+5:302019-09-21T04:10:56+5:30

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - भाजप आणि शिवसेनेच्या जागा वाटपावर चर्चा सुरू असताना काँग्रेसचे अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे, राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे.

Maharashtra Vidhan Sabha 2019 - BJP's entry into Mhatre, Shinde fixed | Vidhan Sabha 2019 : म्हेत्रे, शिंदे यांचा भाजप प्रवेश निश्चित

Vidhan Sabha 2019 : म्हेत्रे, शिंदे यांचा भाजप प्रवेश निश्चित

Next

सोलापूर: भाजप आणि शिवसेनेच्या जागा वाटपावर चर्चा सुरू असताना काँग्रेसचे अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे, राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. म्हेत्रे यांनी शुक्रवारी सायंकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आमदार म्हेत्रे आणि आमदार शिंदे यांनी भाजप प्रवेशासाठी हालचाली सुरू केल्या होत्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार म्हेत्रे यांना पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या तर आमदार शिंदे यांना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या संपर्कात राहायला सांगण्यात आले होते. या दोन्ही नेत्यांच्या प्रवेशाला भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध आहे. या विरोधावर तोडगा काढण्याची जबाबदारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली होती. आमदार म्हेत्रे आणि आमदार शिंदे यांनी मुंबईत तळ ठोकला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्र्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करण्यात आली. दोघांच्या प्रवेशासाठी २२ सप्टेंबरची तारीख निश्चित करण्यात आली आहे.
भालकेंचे ठरले
काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तूर्तास त्यांना थांबण्यास सांगितले आहे. ही जागा यापूर्वी शिवसेनेच्या वाट्याला होती.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 - BJP's entry into Mhatre, Shinde fixed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.