शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

माढ्याच्या संजय शिंदे कुटुंबाची प्रचाराच्या रणधुमाळीत उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 15:55 IST

माढा लोकसभा मतदारसंघातील राष्टÑवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचारासाठी संपूर्ण कुटुंब नव्हे तर त्यांचे अख्खे निमगाव तयारीला लागले आहे.

ठळक मुद्देप्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक कुटुंब व असंख्य कार्यकर्त्यांची फौज कार्यकर्त्यांनाही प्रचारासाठी गावे वाटून दिली आहेतसकाळी उठल्यापासून त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची रांग लागलेली असते

इरफान शेख कुर्डूवाडी: माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचारासाठी संपूर्ण कुटुंब नव्हे तर त्यांचे अख्खे निमगाव तयारीला लागले आहे.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक कुटुंब व असंख्य कार्यकर्त्यांची फौज आहे. कार्यकर्त्यांनाही प्रचारासाठी गावे वाटून दिली आहेत.   प्रचार दौरे, कॉर्नर सभा, सभा आदींची माहिती गावागावांत पोहोचवायची, ग्राउंड रिपोर्ट निमगावला द्यायचा, अशी एक ना अनेक कामे ते करीत आहेत.

सकाळी उठल्यापासून त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची रांग लागलेली असते. प्रत्येकाची भेट घ्यायची  गरज असल्यास त्यांना मंत्रालयात, जिल्हा परिषद, तालुका पंचायतीत बोलवायचे व त्याचे काम करायचे.

उमेदवाराचे नाव । संजय शिंदेसुमारे २५ ते ३० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, कृउबाचे चेअरमन, पंचायत समिती सभापती,  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून काम.

भाऊ। आ. बबनदादा शिंदेगेल्या २५ वर्षांपासून आमदार, जिल्हा दूध संघाचे चेअरमन होते. माढा तालुक्यातील कार्यकर्त्यांची नाळ त्यांच्याशी जोडली आहे.  भावासाठी ते अख्खा तालुका व संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत.

पुतण्या । रणजितसिंह शिंदेतुर्कपिंपरी कारखान्याचे चेअरमन, माढा तालुका पंचायत समितीचे माजी सभापती, विद्यमान जि.प.सदस्य अशा अनेक पदांवर ते कार्यरत आहेत.  तेही प्रचारासाठी संूपर्ण माढा मतदारसंघात सक्रिय आहेत.

पुतण्या । धनराज शिंदेहे तालुका पंचायत सदस्य असून, सध्या ते पंढरपूर व सांगोला तालुक्यात चुलत्याच्या प्रचारासाठी फिरत आहेत.  यांचा जनसंपर्क मोठा असून, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचा मोठा वाटा.

मुलगा। यशवंत शिंदेविठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक. त्यांचे उच्च शिक्षण परदेशात झाले आहे.  आपल्या वडिलांच्या प्रचारासाठी ते करमाळा मतदारसंघात अगदी वस्तीवर फिरुन प्रचार करत आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूरmadha-pcमाढाNCPराष्ट्रवादी काँग्रेसBabanrao Shindeबबनराव शिंदेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक