शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

Lokmat' Agrosthva; शेतकºयांची सर्वांगीण उन्नती साधणारे ‘लोकमत’चे ‘अ‍ॅग्रोत्सव-२०१९’ प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 10:45 IST

सोलापूर : डाळिंब, ऊस आणि द्राक्ष या पिकांना केंद्रस्थानी ठेवून शेतकºयांना मार्गदर्शन, आधुनिक तंत्रज्ञान याची माहिती देणारे  कृषी प्रदर्शन ...

ठळक मुद्देदेशासह राज्यातील कृषी तज्ज्ञांचे शेतकºयांना मार्गदर्शन ऐकायला मिळणारपीक स्पर्धा, कृषी पुरस्कार, नव्या तंत्रज्ञानाची माहिती मिळणार

सोलापूर : डाळिंब, ऊस आणि द्राक्ष या पिकांना केंद्रस्थानी ठेवून शेतकºयांना मार्गदर्शन, आधुनिक तंत्रज्ञान याची माहिती देणारे  कृषी प्रदर्शन पंढरपूर ‘लोकमत’च्या वतीने १३ ते १६ फेब्रुवारीदरम्यान ‘अ‍ॅग्रोत्सव-२०१९’ चे आयोजन करण्यात आले आहे. शेतकºयांना उन्नतीकडे नेणारा हा उपक्रम आहे.

पंढरपूर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात हे कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. एकेकाळी ‘ज्वारीचे कोठार’ म्हणून सोलापूर जिल्ह्याची ओळख होती. आता या जिल्ह्याने कृषी क्षेत्रात क्रांती केली आहे. उजनी धरणामुळे उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. पारंपरिक शेती करण्याऐवजी नव्या तंत्रज्ञानाची या शेतीला जोड देण्याची गरज आहे. त्याशिवाय कृषी उत्पादनात वाढ होणार नाही.

१३ फेब्रुवारी रोजी दत्तात्रय    येडवे गुरुजी (मंगळवेढा) यांचा ‘दुष्काळातून समृद्धीकडे ...’ हा शाहिरी सोहळ्याचा कार्यक्रम तर १४ फेब्रुवारी रोजी परभणीच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकी मार्कंडेय यांचे ‘दुष्काळी परिस्थितीत पशु संवर्धन’ या विषयावर मार्गदर्शन होणार आहे.

 उसाच्या सरासरी उत्पादनात वाढ करण्यासाठी शेतकºयांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन देण्याची गरज आहे. ‘लोकमत’ने याच हेतूने प्रदर्शनात कृषी क्षेत्रातील अनुभवी, कृषिभूषण संजीव माने (रा. आष्टा, जि. सांगली) यांचे ‘एकरी  १०० ते १२५ मे. टन ऊस उत्पादन सहजशक्य’ या विषयावर तर राज्यातील गटशेतीचे समन्वयक, कृषिभूषण नाथाराव कराड यांचे ‘सामूहिक प्रयत्नांतून शाश्वत शेती’ या विषयावर १५ फेब्रुवारी रोजी मार्गदर्शन होणार आहे. याच दिवशी भारत विकास ग्रुपचे संस्थापक हणमंत गायकवाड हे ‘शेतीचे उत्पादन दुप्पट करण्याचे तंत्र’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

आंतरराष्ट्रीय दर्जा लाभलेल्या सोलापुरी डाळिंब उत्पादनात सांगोला, मंगळवेढा आणि पंढरपूर तालुका आघाडीवर आहेत. ‘डाळिंबाच्या विविध जाती, कीड व्यवस्थापन, डाळिंबाच्या अधिक उत्पादनासाठी नवे तंत्रज्ञान, विक्री व्यवस्था, डाळिंबाची निर्यात’ यावर पुणे येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राचे संचालक डॉ. विनय सुपे तर सोलापूरच्या राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे डॉ. नीलेश गायकवाड यांचे ‘डाळिंब: रोग व कीड व्यवस्थापन’ या विषयावर  १६ फेब्रुवारी रोजी मार्गदर्शन होणार आहे.

पीक उत्पादन स्पर्धा- जिल्ह्यातील शेतकरी ऊस, डाळिंब आणि द्राक्ष उत्पादनात आघाडीवर आहेत. त्यांच्या कृषी उत्पादनाचे प्रदर्शन, दर्जेदार आणि विक्रमी पीक उत्पादन स्पर्धांचे आयोजन ‘लोकमत’च्या ‘अ‍ॅग्रोत्सव-२०१९’ मध्ये करण्यात आले आहे. विक्रमी पीक उत्पादनाबाबत शेतकºयांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. सोलापूर , सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकºयांनी या पीक उत्पादन स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आले आहे.

कृषीविषयक प्रश्न पाठवा- शेतकºयांना डाळिंबाविषयी प्रदर्शनात तज्ज्ञांचे सखोल मार्गदर्शन मिळणार आहे. तथापि या संदर्भात शेतकºयांच्या अनेक शंका , प्रश्न असू शकतात़ शेतकºयांनी विकास सातपुते (९०९६८१६८२७) यांच्या मोबाईलवर आपले प्रश्न व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवावेत़ संबंधित विषयांचे तज्ज्ञ त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देतील.

‘लोकमत’च्या ‘अ‍ॅग्रोत्सवा’त तांत्रिक मार्गदर्शनासह कृषी प्रदर्शन पाहण्याची संधी शेतकºयांना मिळणार आहे. विशेषत: डाळिंब, ऊस आणि द्राक्ष या पिकांसाठी नवीन तंत्रज्ञानावर आधारित दालन, संपूर्ण माहिती यावेळी उपलब्ध होणार आहे. सर्वसामान्य शेतकºयांसाठी हे कृषी प्रदर्शन खूपच महत्त्वाचे ठरणार आहे.-डॉ. लालासाहेब तांबडेवरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर

लोकमतने भरवलेल्या कृषी प्रदर्शनामध्ये डाळिंब व ऊस याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे. ही शेतकºयांसाठी खूप मोठी पर्वणीच आहे. सध्या शेतकºयांना मजुरांचा प्रश्न भेडसावत आहे. त्यावर उपाय म्हणून यांत्रिकीकरणाची माहिती सांगणारी यंत्रणा देखील याठिकाणी राहणार आहे. ही बाब देखील शेतकºयांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.- रवींद्र कांबळेकृषी सहायक अधीक्षक, पंढरपूर

राष्ट्रीय डाळिंब सशोधन केंद्राने सोलापूर लाल ही डाळिंबाची नवीन जात विकसित केली आहे. ‘लोकमत’च्या ‘अ‍ॅग्रोत्सवा’त या नवीन जातीविषयी शेतकºयांना माहिती देण्यात येणार आहे. डाळिंबावर प्रक्रिया करुन अनेक पदार्थ करता येतात. याविषयी शेतकºयांना उपयुक्त माहिती मिळणार आहे. त्यामुळे या ‘अ‍ॅग्रोत्सवा’चे वेगळे महत्त्व राहील.-ज्योत्स्ना शर्मासंचालक राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर 

‘सोलापूर लाल’ डाळिंबाचे आकर्षणसोलापुरातील राष्टÑीय डाळिंब संशोधन केंद्राने संशोधित केलेले ‘सोलापूर लाल’ या डाळिंबाच्या वाणाची मोठी चर्चा आहे. हे वाण संपूर्ण जगभरात गेले आहे. लोहयुक्त संकरित असे हे वाण असून, सोलापूर लाल जातीच्या झाडाची उंची भगव्यापेक्षा जास्त असल्याने मर व तेल्या कमी प्रमाणात असल्याने या डाळिंबामध्ये जीवनसत्त्वाचे प्रमाण इतरांपेक्षा जास्त आहे.

सोलापूरचे डाळिंबसोलापूर जिल्ह्यात सांगोला, पंढरपूर आणि मंगळवेढा परिसरात डाळिंब मोठ्या प्रमाणावर पिकविले जाते. कोरडवाहू क्षेत्रात असणारी पाण्याची कमतरता, कमी पाऊस आणि जमीन यामुळे या भागात डाळिंब, बोर अशी पिके घेण्याशिवाय पर्याय उरला नाही. त्यात डाळिंबाला देश आणि परदेशात मिळणारा भाव पाहता या भागातील शेतकºयांचे जीवनमान उंचावण्यात डाळिंबाचा मोठा वाटा आहे. आरोग्याला लाभदायक अशा डाळिंबामुळे त्याला मागणीही आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरLokmat Eventलोकमत इव्हेंटagricultureशेतीFarmerशेतकरी