सांगोला : लक्ष्मीनगर (ता. सांगोला) येथे नवनाथ विलास नरळे या तरुणाचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री १० च्या सुमारास घडली. पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे. नवनाथ विलास नरळे (वय २२) या युवकाला बुधवारी रात्री दहाच्या सुमारास विजेचा धक्का बसला होता व तो यात गंभीर जखमी झाला होता. त्यांचे वडील विलास नरळे यांनी उपचारासाठी दाखल केले; मात्र डॉ. पियुष पाटील यांनी तो मयत झाल्याचे सांगितले. अधिक तपास पो. कॉ. विकास जाधव करीत आहेत.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}