शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
2
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ
3
Tariff War: "भारत, चीनला धमक्या देऊन काही होणार नाही"; रशियाने अमेरिकेला तिखट शब्दात सुनावले
4
बदल्याची आग! "मला ४ लाख दे नाहीतर..."; वडिलांनी लेकाला केलं किडनॅप, पत्नीला दिली धमकी
5
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
6
वैभव सूर्यवंशी आकाशातून थेट खेळपट्टीवर उतरला.. ऑस्ट्रेलियाला पोहोचताच समोर आला भन्नाट VIDEO
7
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
8
तीन सरकारी बस एकमेकांवर धडकल्या, ४० हून अधिक प्रवासी जखमी, अनेकांची प्रकृती चिंताजनक  
9
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
10
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
11
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
12
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
13
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
14
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
15
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
16
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
17
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
18
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
19
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
20
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...

उजनीतून पुन्हा भीमेत पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 10:49 IST

पुणे परिसरात पाऊस; ११,६०० क्युसेकचा विसर्ग

ठळक मुद्देउजनी धरणात पाणी वाढल्याने भीमेत पुन्हा विसर्ग सोडण्यात आलाजादा होणारे पाणी वाया घालविण्याऐवजी कालव्याद्वारे जास्तीतजास्त पाणी अवर्षण क्षेत्राला देण्यासाठी प्रयत्नदुष्काळी भागासाठी जादा पाणी देण्याचे नियोजन करण्यात यावे अशी मागणी होत आहे

सोलापूर : उजनी धरणात पाणी वाढू लागल्याने पुन्हा रविवारी भीमेत ११ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला आहे. 

पुणे परिसरात शनिवारी पावसाने हजेरी लावली. यामुळे दौंड येथून १२ हजार ३५१ तर बंडगार्डनहून ९ हजार ७६0 क्युसेकचा विसर्ग धरणात येत आहे. रविवारी सकाळी सहा वाजता धरणातील पाणी पातळी ४९७.२८0 मीटरवर गेली. धरणात १२२. ६६ टीएमसी पाणीसाठा झाल्याने सकाळपासून २९00 क्युसेक पाणी भीमेत सोडण्यात आले. त्याचबरोबर वीजनिर्मितीसाठी १६०० असा ४५०० क्युसेकचा प्रवाह भीमेत सुरू झाला. त्याचबरोबर मुख्य कालव्याला ३१५0, बोगद्यातून १२00 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. सकाळी दहा वाजता भाटघर येथून ९१0, नीरादेवधर येथून ७५0 क्युसेक पाणी सोडण्यात येत होते. 

वीरधरणातून नीरेत ४८८७ क्युसेकचा प्रवाह कायम आहे. दुपारी बारा वाजता उजनीतून डिचार्ज ५१00 क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला. सायंकाळी पाच वाजता मात्र डिचार्ज दहा हजारांवर नेण्यात आला आहे. वीजनिर्मितीसह उजनी धरणातून भीमेत ११ हजार ६00 क्युसेकचा विसर्ग येत आहे. 

अवर्षणग्रस्त क्षेत्राला पाणी द्यावे !- उजनी धरणात पाणी वाढल्याने भीमेत पुन्हा विसर्ग सोडण्यात आला आहे. जादा होणारे पाणी वाया घालविण्याऐवजी कालव्याद्वारे जास्तीतजास्त पाणी अवर्षण क्षेत्राला देण्यासाठी प्रयत्न करण्यात यावा अशी मागणी होत आहे. कालव्यातून सोडलेले पाणी टेल एंडला अद्याप पोहोचलेले नाही. सुरुवातीचे शेतकरी पाणी घेत असल्याने पाण्याचा वेग मंदावला आहे. त्यामुळे कित्येक शाखांतून अजून पाणी गेलेले नाही. त्यामुळे वरच्या भागाला पाणी जादा देण्यात येत आहे. अशात पाणी बंद केल्यास टेल एंडच्या शेतकºयांना पाणी मिळणे अवघड होणार आहे. याशिवाय वरच्या भागाला पाणी जादा झाल्यावर कालवे फुटण्याची शक्यता दाट असते. त्यामुळे पाणी बंद करावे लागते. दुष्काळी भागासाठी जादा पाणी देण्याचे नियोजन करण्यात यावे अशी मागणी होत आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणwater shortageपाणीकपातwater transportजलवाहतूकPuneपुणेRainपाऊस