बिबटया सदृश्य प्राण्याचा हल्ला; शेतात कामासाठी गेलेल्या लिंबेवाडीतील तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 08:55 IST2020-12-04T08:54:23+5:302020-12-04T08:55:16+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Leopard-like animal attack; Death of a young man from Limbewadi who went to work in a field | बिबटया सदृश्य प्राण्याचा हल्ला; शेतात कामासाठी गेलेल्या लिंबेवाडीतील तरुणाचा मृत्यू

बिबटया सदृश्य प्राण्याचा हल्ला; शेतात कामासाठी गेलेल्या लिंबेवाडीतील तरुणाचा मृत्यू

करमाळा :  शेतात दारे धरण्यासाठी गेलेल्या कल्याण देविदास फुंदे या तरूणावर बिबटया सदृश्य प्राण्याने हल्ला करुन त्यास ठार केल्याची घटना लिंबेवाडी (ता.करमाळा) शिवारात आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.


रावगाव व शेगुडच्या मध्ये असलेल्या लिंबेवाडी शिवारात  फुंदे हा शेतकरी ज्वारी चे भरणे करीत असताना त्याच्यावर बिबटया सदृश्य प्राण्याने हल्ला करून त्यास ठार केले. रात्र झाली तरी कल्याण शेतातून घरी परत येत नसल्याने घरच्या मंडळींनी शोध घेतला असता शेतात कल्याणच्या चपला व रक्त जमिनीवर सांडलेले दिसले.

पोलिसांनी गावक-यांच्या मदतीने शोध घेतला असता कल्याणचे मुंडके नसलेला मृतदेह शेतात झुडपात आढळून आला. रात्री उशीरा कल्याणचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात आणला आहे. बिबटयाच्या दहशतीमुळे संपुर्ण परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: Leopard-like animal attack; Death of a young man from Limbewadi who went to work in a field