शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

दहा वर्षांत सोलापूर लोकसभा मतदारसंघात चाललाच नाही अपक्षांचा बोलबाला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:17 PM

लोकमत स्पेशल रिपोर्ट । २००४ ला भाजपला लॉटरी, काँग्रेसला बसला आश्चर्यकारक फटका

ठळक मुद्देसध्या सर्वत्रच लोकसभा  निवडणुकीसाठी प्रचाराचा धुराळा चांगलाच उडू लागला सोलापूर जिल्ह्यात मात्र गत दोन पंचवार्षिक निवडणुकीत अपक्षांची  दुसºया क्रमांकावरील उमेदवाराला मिळालेली नाही२००४ च्या निवडणुकीत मात्र अपक्षांमुळे काँग्रेसच्या उज्ज्वला शिंदे यांना फटका बसला

विलास जळकोटकर

सोलापूर : सध्या सर्वत्रच लोकसभा  निवडणुकीसाठी प्रचाराचा धुराळा चांगलाच उडू लागला आहे. अनेक ठिकाणी बंडखोरी करुन अपक्ष निवडणूक लढवणाºया उमेदवाराचा फटका विजयाच्या दृष्टिक्षेपात असणाºया उमेदवाला मिळालेला आहे. सोलापूर जिल्ह्यात मात्र गत दोन पंचवार्षिक निवडणुकीत अपक्षांची  दुसºया क्रमांकावरील उमेदवाराला मिळालेली नाही हे आकडेवारीवरुन स्पष्ट होते. २००४ च्या निवडणुकीत मात्र अपक्षांमुळे काँग्रेसच्या उज्ज्वला शिंदे यांना फटका बसला. भाजपच्या सुभाष देशमुखांना विजयाच्या रुपाने लॉटरी लागली.

२००९ च्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारामध्ये चुरशीची लढत होऊन काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे ९९,६१२ मतांच्या फरकाने विजयी झाले. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी भाजपचे शरद बनसोडे हे २,८७,८७० मतांनी पराभूत झाले. या निवडणुकीत ७ अपक्ष रिंगणात होते. या सर्वांना मिळून २७,९७६ मते मिळाली. ही आकडेवारी विजयाच्या मार्जिनमध्ये जमा केली तरी इथे अपक्ष डोकेदुखी ठरले नसल्याचेच स्पष्ट होते.

गत २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवर दृष्टिक्षेप टाकला तरीही असेच चित्र दिसते. त्यावेळीही काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे आणि भाजपकडून शरद बनसोडे यांचीच उमेदवारी होती. या निवडणुकीत भाजपचे बनसोडे १,४९,३८१ मताधिक्याने विजयी झाले. यावेळी १० अपक्ष रिंगणात होते. त्यांना मिळालेल्या मतांची बेरीज केवळ १९,१८० होती म्हणजे ही मते पराभूत उमेदवाराच्या खात्यात टाकूनही विजयाचे समीकरण जुळले नसते. 

२००४ च्या निवडणुकीत उमेदवार कमी तसे अपक्षांची संख्या केवळ २ असतानाही त्यांनी मिळवलेली ११ हजार ७६० मते काँग्रेसच्या उज्ज्वला शिंदे यांना डोईजड ठरले. भाजपचे सुभाष देशमुख यांचा निसटता विजय झाला अशीच मतदानाची आकडेवारी सांगते.

२००४ मध्ये अपक्षांचा करिश्मा- सन २००४ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र अपक्षांचा करिश्मा चालल्याचे दिसते. इथे काँग्रेसच्या उज्ज्वला शिंदे यांना अपक्ष उमेदवार डोकेदुखी ठरले. यावेळी एकूण सहा जण रिंगणामध्ये होते. त्या दोन अपक्षांना मिळालेल्या मतांची बेरीज ११,७६० होते. भाजपचे सुभाष देशमुख यांनी ३,१६,१८८ मते मिळवून विजयी झाले. निकटच्या काँग्रेसच्या उज्ज्वला शिंदे यांना ३१०३९० मते मिळाली. त्यांना केवळ ५,७९८ मतांनी पराभव चाखावा लागला. इथे अपक्षांची उमेदवारी विजयाला अडसर ठरल्याचा इतिहास सोलापूरकर जाणून आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSubhash Deshmukhसुभाष देशमुख